अतूट नातं! आजीने अत्यंत प्रेमाने आजोबांना भरवलं जेवण; हृदयस्पर्शी Video तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 10:29 AM2023-02-20T10:29:25+5:302023-02-20T10:37:41+5:30

एक वृद्ध महिला पतीला आपल्या हाताने प्रेमाने जेवण भरवताना दिसत आहे.

grandmother seen lovingly feeding her sick husband force to cry after watching the video | अतूट नातं! आजीने अत्यंत प्रेमाने आजोबांना भरवलं जेवण; हृदयस्पर्शी Video तुफान व्हायरल

अतूट नातं! आजीने अत्यंत प्रेमाने आजोबांना भरवलं जेवण; हृदयस्पर्शी Video तुफान व्हायरल

googlenewsNext

जेव्हा आपण व्हिडीओ पाहण्यासाठी आपला फोन उचलतो तेव्हा आपण असे काही भावनिक व्हिडीओ पाहतो ज्यामुळे आपल्या डोळ्यात पाणी येतं. व्हिडीओ जर वडिलधाऱ्यांचा असेल तर लोक आणखी जास्त कनेक्ट होतात. असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक वृद्ध महिला पतीला आपल्या हाताने प्रेमाने जेवण भरवताना दिसत आहे. हा व्हिडीओ खूप जास्त लोकांनी लाईक केला असून सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

एनिमेटर अबा जियॉनने इन्स्टाग्रामवर एका सार्वजनिक कार्यक्रमातील वृद्ध जोडप्याचा व्हिडीओ पोस्ट केला. व्हिडीओमध्ये आपल्या नवऱ्याच्या शेजारी बसलेली वृद्ध महिला त्याला स्वतःच्या हाताने खाऊ घालताना दिसत. इंटरनेटवर या व्हिडीओने अनेक लोकांची मनं जिंकली आहेत. आजीच्या प्रेमाने खूप लोक प्रभावित झाले कारण ती अत्यंत काळजी घेत पतीला प्रत्येक घास भरवत आहे. 

व्हिडिओ पाहून लोक खूप भावूक झाले. एका व्यक्तीने कमेंटमध्ये लिहिले, "मला वाटतं ज्या लोकांनी प्रेमाचा अनुभव घेतला नाही, त्यांना हा क्षण समजणार नाही. हे प्रेम समजून घेण्यासाठी त्यांना आधी असंच प्रेम करावं लागेल. अनेक वर्षे एकमेकांची काळजी घ्या आणि एकमेकांचा आधार व्हा.

आणखी एका युजरने लिहिले की, "या जगात कोणीही एकमेकांना मदत केल्याशिवाय राहू शकत नाही. प्रत्येकाने मदत केली पाहिजे." तिसऱ्या व्यक्तीने "खूप भाग्यवान व्यक्तीला असे प्रेम मिळते. शेवटच्या वेळी एकत्र राहण्याची इच्छा आहे" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: grandmother seen lovingly feeding her sick husband force to cry after watching the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.