Best Job: 'ही' आहे जगातील सर्वात चांगली कंपनी! प्रत्येक कर्मचाऱ्याला देते किमान 63 लाखांचे पॅकेज...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 02:31 PM2022-08-10T14:31:17+5:302022-08-10T14:31:35+5:30
Trending News: कोरोना काळात हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, पण एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात भरगोस वाढ केली.
Latest Trending News: कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे जगातील बहुतेक देश आर्थिक मंदीकडे जात आहेत. त्याचा प्रभाव दीर्घकाळ दिसून येणार आहे. यातच खर्च वाचवण्यासाठी बहुतांश कंपन्या कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहेत, अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे पगार कमी केले आहेत. पण या सगळ्यात एक अशी कंपनी आहे, जी आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढवत आहे. या कंपनीचे सीईओ आपल्या कर्मचाऱ्यांना वर्षाला किमान $80 हजार म्हणजेच सुमारे 63,65,008 रुपये देत आहेत. इतर कंपन्यांनीही अशी पावले उचलावीत आणि योग्य पगार द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
पगारासोबत कंपनी भरगोस सुट्ट्याही देते
कर्मचाऱ्यांना जास्त पगार देऊन चर्चेत येणारी कंपनी म्हणजे 'ग्रॅविटी पेमेंट्स'. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅन प्राइस आहेत. कर्मचाऱ्यांना वाढीव पगार देण्याबाबत डॅन प्राइस सांगतात की, 'त्यांनी कंपनी प्रत्येक कर्मचाऱ्याला किमान 80 हजार डॉलर्सचे पॅकेज देते. यात रिमोट वर्किंग आणि फ्लेक्सिबल वर्कचा पर्यायदेखील उपलब्ध आहे. याशिवाय कंपनी पॅरेंट लीव्हसाठीही काही पैसे देतो.'
My company pays an $80k min wage, lets people work wherever they want, has full benefits, paid parental leave, etc.
— Dan Price (@DanPriceSeattle) August 8, 2022
We get over 300 applicants per job.
"No one wants to work" is a hell of a way of saying "companies won't pay workers a fair wage and treat them with respect."
इतर कंपन्यांना आवाहन केले
डॅन प्राइसने ट्विटरवरुन माहिती देताना म्हटले की, 'माझी कंपनी फक्त पगाराची काळजी घेत नाही, तर कर्मचाऱ्यांच्या इतर सुविधांचीही काळजी घेते. कंपनीत किमान 80 हजार डॉलर्सपासून पगार सुरू होतो. त्यांना कुठूनही काम करण्याचे स्वातंत्र्य आहे. याशिवाय आम्ही पॅरेंट लीव्हसाठीही पैसे देतो. एका पोस्टसाठी आमच्याकडे 300 पेक्षा लोक अर्ज करतात. कोणीही वाईट वातावरणात काम करू इच्छित नाही. त्यामुळे प्रत्येक कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य पगार दिला पाहिजे.'
6 वर्षांपूर्वी वाढ सुरू केली.
त्यांनी सोशल मीडियावर सांगितले की, 6 वर्षांपूर्वी त्यांनी कंपनीतील प्रत्येक कर्मचार्याचा पगार 70 हजार डॉलरपर्यंत कसा वाढवता येईल, याचा विचार केला होता. पण, सध्या ते आपल्या कर्मचाऱ्यांना 80 हजार डॉलरपर्यंत वाढवला आहे. कर्मचाऱ्यांची पगार वाढल्यापासून कंपनीचा महसूलही तिपटीने वाढल्याचे त्यांनी सांगितले.