उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग! नवरदेवाची एंट्री पाहुन तुम्ही जाल हडबडून...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 11:17 AM2021-08-03T11:17:30+5:302021-08-03T11:18:38+5:30

नेकजणांचे लग्नाचे व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर त्यातील खास गोष्टींमुळे व्हायरल होतात. काही व्हिडिओ अतिशय मजेशीर (Funny Videos) असतात, तर काही हैराण करणारे. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यातील नवरदेवाची एंट्री पाहुन तुम्ही हडबडून जाल.

groom dancing in the wedding on bollywood song, sajan ji ghar aaye goes viral | उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग! नवरदेवाची एंट्री पाहुन तुम्ही जाल हडबडून...

उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग! नवरदेवाची एंट्री पाहुन तुम्ही जाल हडबडून...

Next

लग्नसमरांभाच्या व्हिडिओंवर सोशल मिडिया युजर्सची खास मेहरनजर असते. अनेकजणांचे लग्नाचे व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर त्यातील खास गोष्टींमुळे व्हायरल होतात. काही व्हिडिओ अतिशय मजेशीर (Funny Videos) असतात, तर काही हैराण करणारे. काही व्हिडिओ तर असे असतात ज्यावर विश्वास ठेवणंही कठीण जातं. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यातील नवरदेवाची एंट्री पाहुन तुम्ही हडबडून जाल.

आजकाल अनेक लग्नांमध्ये नवरा नवरीही डान्स करतात. सध्या तसा ट्रेण्डच आहे. वधुवरांचा हा डान्स म्हणजे वऱ्हाड्यांसाठी खास आकर्षण. प्रत्येकजण वधुवरांच्या डान्सची वाट पाहत असतो. पण या व्हिडिओतील नवरदेव लग्नासाठी इतका उतावळा झालाय की त्याने डान्स करतच हॉलमध्ये एंट्री घेतलीय. तो बॉलिवूडचं प्रसिद्ध गाणं ‘तेरे घर आया, मैं आया तुझको लेने…’ वर डान्स करत आहे. 

नवरदेवाचा हा बिनधास्त अंदाज सोशल मीडियावर लोकांच्या पसंतीस उतरत आहे. याच कारणामुळे अनेकजण यावर कमेंट करत आहेत. एका यूजरनं लिहिलं, की नवरदेवाचा असा डान्स मी पहिल्यांदाच पाहिला आहे. तर दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की आतापर्यंतचा सर्वात जबरदस्त परफॉर्मन्स. याशिवाय इतरही अनेकांनी कमेंट करत नवरदेवाच्या डान्सचं कौतुक केलं आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर द वेडिंग मेनिया नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

Web Title: groom dancing in the wedding on bollywood song, sajan ji ghar aaye goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.