नवरदेवाच्या मित्रानं नवरीला दिलं अजब गिफ्ट; उघडून बघितलं अन् बसला आश्चर्याचा धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 02:05 PM2022-02-02T14:05:31+5:302022-02-02T14:06:01+5:30

लग्नात भेटवस्तू देण्याचीही प्रथा आहे. यातच काही वेळा काही जण गंमतीने विचित्र भेटवस्तूही देतात. मात्र, त्या भेटवस्तू उघडून पाहिल्यानंतर अनेकवेळा आश्चर्याचा धक्काही बसतो.

Groom friend gave a shocking gift to the bride in wedding she had surprise when open it | नवरदेवाच्या मित्रानं नवरीला दिलं अजब गिफ्ट; उघडून बघितलं अन् बसला आश्चर्याचा धक्का!

नवरदेवाच्या मित्रानं नवरीला दिलं अजब गिफ्ट; उघडून बघितलं अन् बसला आश्चर्याचा धक्का!

Next

लग्न समारंभांच्या काळात अनेक वेळा काही असे व्हिडिओ व्हायरल होतात, ज्यांचा आपण कधी विचारही  केलेला नसतो.  वर आणि वधू जेव्हा स्टेजवर असतात तेव्हा त्यांचे मित्र ना-ना प्रकारचे विनोद करताना दिसतात. ते अनेक वेळा सर्वांसमोरच काही तरी विचित्रपणाही करतात. लग्नात भेटवस्तू देण्याचीही प्रथा आहे. यातच काही वेळा काही जण गंमतीने विचित्र भेटवस्तूही देतात. मात्र, त्या भेटवस्तू उघडून पाहिल्यानंतर अनेकवेळा आश्चर्याचा धक्काही बसतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

नवरीने गिफ्ट उघडताच बसला आश्चर्याचा धक्का -
असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वधू-वर स्टेजवर बसलेले दिसत आहेत. याच दरम्यान त्यांचा एका मित्र त्यांना एक मोठा बॉक्स गिफ्ट करतो. तो बॉक्स पाहून वधू अत्यंत खूश होते आणि ते गिफ्ट ती स्टेजवरच उघडायला सुरुवात करते. हा बॉक्स उघडताच तिला आश्चर्याचा धक्का बसतो. कारण या बॉक्समध्ये आणखी दोन बॉक्स आणि एक पॅकेट निघाले, पॅकेट उघडल्यानंतर तिला त्यात आणखी दुसरे पॅकेट सापडले. अशा प्रकारे ती अनेक पॅकेट्स उघडते.

मित्रानं वधू-वराला दिला जबरदस्त मेसेज -
यानंतर वधूने जेव्हा अखेरचे पॅकेट उघडले, तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला. कारण तिला त्या पॅकेटमध्ये मास्क मिळाले. एवढ्या मोठ्या बॉक्समध्ये एवढेसे मास्क बघून तिला आश्चर्याचा धक्का बसला. खरे तर, कोरोना काळात लग्नाच्यावेळीही मास्क लावायला हवा, असा मेसेज मित्रांनी या जोडप्याला दिला.

हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. इंस्टाग्रामवर (Instagram Reels) घंटा नावाच्या अकाउंटवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. महत्वाचे म्हणजे दोन लाखहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाइकही केला आहे.
 

Web Title: Groom friend gave a shocking gift to the bride in wedding she had surprise when open it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.