Video - नशेत धूंद असलेला नवरदेव नवरीऐवजी सासूलाच घालू लागला हार; मग स्टेजवरच्या लोकांनी...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 03:47 PM2022-04-01T15:47:53+5:302022-04-01T15:53:18+5:30

Video - लग्नातला व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही हैराण व्हाल. सध्या याच व्हिडिओची तुफान चर्चा रंगली आहे. 

groom put garland on his mother in law instead of bride then this happened on stage viral video | Video - नशेत धूंद असलेला नवरदेव नवरीऐवजी सासूलाच घालू लागला हार; मग स्टेजवरच्या लोकांनी...

फोटो - NDTV

Next

नवी दिल्ली - लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट असते. लग्नाचे भन्नाट किस्से आणि हटके व्हिडीओ हे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असतात. अनेकदा लग्नात भरपूर मजमस्ती करून ते क्षण आयुष्यभरासाठी साठवून ठेवले जातात. लग्नात कधी नवरानवरीची तर कधी नातेवाईक आणि मित्रमैत्रिणीची धमाल सुरू असते. अशाच एक लग्नातला व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही हैराण व्हाल. सध्या याच व्हिडिओची तुफान चर्चा रंगली आहे. 

नशेत धूंद असलेल्या एका नवरदेव वधूऐवजी थेट सासूलाच हार घातल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. नवरदेव इतका नशेत आहे, की त्याला आपण काय करत आहोत, हेही समजत नाही. वधूऐवजी आपल्या सासूला हार घालू लागतो. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून तो वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये वधू आणि वर दोघेही लग्नासाठी स्टेजवर उभे आहेत. वराने हातात हार घेतलेला दिसत आहे. यानंतर, जेव्हा त्याला वधूला हार घालण्यास सांगितले जाते तेव्हा तो वधूऐवजी सासूला हार घालू लागतो. हे पाहून शेजारी उभ्या असलेल्या लोकांनी त्याला अडवलं.

लग्नासाठी उपस्थित असलेले नातेवाईक वराला वधूला हार घालण्यास सांगतात. लोकांचे म्हणणे ऐकून वराने डोकं हलवले आणि नंतर मोठ्या कष्टाने वधूच्या गळ्यात हार घालण्याचा प्रयत्न केल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. पण तो इतका नशेत होता, की त्याला स्वत:चा तोल सांभाळणं देखील शक्य होत नव्हतं. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. हा फनी व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक केला आहे. लग्नाचे अनेक हटके व्हिडीओ हे नेहमीच व्हायरल होत असतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: groom put garland on his mother in law instead of bride then this happened on stage viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.