अजब प्रेम! प्रेमविवाहानंतर पती मेव्हणीसह झाला फरार, पत्नीला बसला धक्का अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 09:19 PM2022-12-22T21:19:06+5:302022-12-22T21:22:08+5:30
पती- पत्नी यांच्यातील वाद आणि नंतर पती आपल्या लहान मेव्हणीसह पळून गेल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
पती- पत्नी यांच्यातील वाद आणि नंतर पती आपल्या लहान मेव्हणीसह पळून गेल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील आहे, येथे एका पतीने आपल्या पत्नीसोबत प्रेमविवाह केला होता, पण नंतर असे काही घडले की तो पती पत्नीला सोडून आपल्या लहान मेव्हणीसह पळून गेल्याची घटना समोर आली आहे.
ही घटना उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील आहे. येथील कोतवाली परिसरातून प्रेयसीसोबत प्रेमविवाह केल्यानंतर पती लहान मेव्हणीच्या प्रेमात पडून तिला घेऊन पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे सहा महिन्यांपूर्वी एका व्यक्तीने आपल्या मैत्रिणीशी लग्न केले होते, नंतर काही दिवस हे पती पत्नी एकत्र राहत होते.
पतीचे लहान बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. सासरच्या घरी येण-जाण सुरू झाल्यावर तरुणाचे प्रेम लहान बहिणीवर झाले. दोन दिवसांपूर्वी सासरच्या घरी पोहोचलेल्या तरुणाने मेव्हणीसह फरार झाला आहे. हा प्रकार कळताच एकच खळबळ उडाली. पतीसह बहीण फरार झाल्याची माहिती मिळताच संतप्त झालेल्या पत्नीने सासर सोडले आहे.
कोरोनाची अशीही भीती; अडीच वर्षांपासून माय-लेकीने स्वतःला खोलीत कोंडून घेतले, आता बाहेर येताच...
पत्नी मैत्रिणीच्या घरी जावून थांबली आहे.तर दुसरीकडे दोन्ही कुटुंबात तणावाचे वातावरण झाले आहे. हे प्रकरण पंचायतीमध्ये गेले आहे.तरुण आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन आपल्या मेहुणीशी लग्न करणार असल्याचे समोर आले आहे.