अरे देवा! नवरीला किस करायला गेला अन् घडलं भलतंच, बघून पोट धरून हसाल....
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 12:12 PM2021-07-26T12:12:09+5:302021-07-26T12:13:20+5:30
समजा तुमच्या लग्नात तुम्ही तुमचा नवरा नवरी सोडून भलत्यालाच किस केलं तर काय होईल? तुमचं लग्न तर मोडलंच म्हणून समजा. अशाच एका नवरोबाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय. यात नवरोबाची फजिती पाहुन लोक पोट धरुन हसत आहेत.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की नवरदेव डोळे बंद करून नवरीची वाट पाहत आहे. तो आपले हात नवरीसाठी पुढे करतो इतक्यात फोटोग्राफर मध्ये येतो. डोळे बंद केलेला नवरदेव फोटोग्राफरलाच नवरी समजतो आणि त्याच्या माथ्यावर किस करतो. यानंतर तो आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला समोर फोटोग्राफर दिसतो. यानंतर त्यालादेखील काही वेळासाठी धक्का बसतो आणि नंतर तो फोटोग्राफरला धक्का देत बाजूला करतो. शेजारीच उभी असलेली नवरीबाई हे सर्व पाहून हसू लागते.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर हेप्गु १५ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा मजशीर व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून तो लोकांच्या पसंतीस उतरत आहे. लोक हा व्हिडिओ एकमेकांना शेअर करण्यासोबतच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. नवरदेवाच्या फजितीचा हा व्हिडिओ पाहून नेटकरी पोट धरून हसत आहेत.