PPE Kit घालुन मुलींनी खेळला रासगरबा, कोरोनाशी दोन हात करणाऱ्या या गरब्याची भलतीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 03:30 PM2021-10-14T15:30:40+5:302021-10-14T15:31:04+5:30

यावेळी नवरात्रीच्या सणावर आणि पर्यायाने गरब्यावर कोरोनाचे सावट आहे. पण नेमके याचेच निमित्त साधुन यावेळी गुजरातमधील काही मुलींनी लोकांना जागरूक करण्यासाठी पीपीई किट (PPE kit ) घालून नृत्य केले. 

Gujrat Rajkot girls dance wearing PPE kit to make awareness about corona | PPE Kit घालुन मुलींनी खेळला रासगरबा, कोरोनाशी दोन हात करणाऱ्या या गरब्याची भलतीच चर्चा

PPE Kit घालुन मुलींनी खेळला रासगरबा, कोरोनाशी दोन हात करणाऱ्या या गरब्याची भलतीच चर्चा

Next

नवरात्र हा गुजरातमधील सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक. इथला गरबा जगभरात प्रसिद्ध आहे. परंपरेनुसार गरबा आणि दांडिया करताना रंगीबेरंगी कपडे घातले. मात्र यावेळी या सणावर आणि पर्यायाने गरब्यावर कोरोनाचे सावट आहे. पण नेमके याचेच निमित्त साधुन यावेळी गुजरातमधील काही मुलींनी लोकांना जागरूक करण्यासाठी पीपीई किट (PPE kit ) घालून नृत्य केले. 

गरबा खेळताना सोशल डिस्टंसिंग पाळणं शक्य नसतं, म्हणून गुजरातच्या काही मुलींनी चक्क पीपीई कीट घालून गरबा खेळण्याचा आनंद लुटला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहु शकता की, पीपीई कीट घालून या मुली गरबा खेळत आहेत. गरबा खेळण्यासाठी खास पांढऱ्या रंगाचे पीपीई कीटस् मुलींनी बनवून घेतले.

एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेने ट्वीटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. शेअर करताच या व्हिडिओला तुफान पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच बहुतेक लोकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवण्यास सुरुवात केली. एका युजरने लिहिले की कोरोनाच्या युगात अशी जागरूकता निर्माण करणे खरोखरच एक चांगला उपक्रम आहे. त्याच वेळी, दुसर्‍याने, सणांमध्ये आपण विशेष काळजी घेतली पाहिजे कारण कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

Web Title: Gujrat Rajkot girls dance wearing PPE kit to make awareness about corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.