विष घ्या विष..! ट्रेनमध्ये 'मृत्यू' विकणाऱ्या व्यक्तीचा भन्नाट VIDEO व्हायरल; एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 06:41 PM2021-09-01T18:41:04+5:302021-09-01T18:42:11+5:30

गुटखा विक्रेत्याची स्टाईल पाहून अनेकांना हसू अनावर; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

gutka vendor selling tobacco in train in unique way video viral on social media | विष घ्या विष..! ट्रेनमध्ये 'मृत्यू' विकणाऱ्या व्यक्तीचा भन्नाट VIDEO व्हायरल; एकदा पाहाच

विष घ्या विष..! ट्रेनमध्ये 'मृत्यू' विकणाऱ्या व्यक्तीचा भन्नाट VIDEO व्हायरल; एकदा पाहाच

Next

बिहार: कोणत्याही व्यवसायिकाकडे विक्रीची कला असायला हवी. त्यामुळेच तर आज काल जाहिरातीवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. कंपन्या मार्केटिंगसाठी विशेष टीम नेमतात. त्यांना प्रचंड पगार देतात. मात्र छोट्या विक्रेत्यांनी काय करायचं? असा प्रश्न आहेच. ट्रेनमध्ये तंबाखू विकणाऱ्या एका व्यक्तीनं यावर त्याच्या परीनं उत्तर शोधलं आहे. या गुटखा विक्रेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

रविवारी एक विक्रेता आसनसोल-वाराणसी पॅसेंजर ट्रेनमध्ये पान मसाला आणि गुटखा विकत होता. त्याची विक्रीची शैली इतरांपेक्षा खूप वेगळी होती. गुटखा खा आणि कॅन्सरला आमंत्रण द्या, अशा शब्दांत विक्रेता गुटख्याची विक्री करत होता. घरातले नशेडी, नालायकांनी येऊन माझ्याकडून नक्की गुटखा खरेदी करावा, असं गुटखा विक्रेत म्हणत होता. त्यामुळे संपूर्ण डब्यातल्या प्रवाशांचं लक्ष त्याच्याकडे गेले. तंबाखूचे दुष्परिणाम सांगून तो तंबाखूचीच विक्री करत होता.

आपल्या वेगळ्याच स्टाईलमुळे तंबाखू विक्रेत्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 'ज्यांचं आपल्या आयुष्यावर प्रेम नाही, जे मरणाची वाट पाहत आहेत, त्यांनी यावं आणि गुटखा खावा,' अशा शब्दांत विक्रेता गुटख्याचं मार्केटिंग करत होता. 'विष घ्या, विष घ्या. गुटखा खा आणि एका महिन्यात कॅन्सरनं मरा. तुमचे दात काळे करून घ्या. घशाचा आजार मोफत मिळवा,' असं म्हणत गुटखा, पान मसाल्याची विक्री सुरू होती. सासाराम स्थानकातून पॅसेंजर ट्रेनमध्ये चढलेला विक्रेता भभुवा रोड स्थानकात उतरला. मात्र त्याच्या या भन्नाट शैलीची चर्चा रेल्वेच्या प्रवाशांमध्ये बराच वेळ सुरू होती.

Web Title: gutka vendor selling tobacco in train in unique way video viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.