Hair Dryer Fire Video: हेअर ड्रायरचा वापर करण्यापूर्वी हा व्हिडीओ पहा; सलूनमधील आहे..., हात थरथरतील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 06:40 PM2022-09-10T18:40:29+5:302022-09-10T18:50:35+5:30

जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यात हेअर ड्रायर जिवघेणा ठरत असल्याचे दिसत आहे.

Hair Dryer Fire Video: Hair dryer blows fire; both barber, customer in flames, Shocking Video goes viral | Hair Dryer Fire Video: हेअर ड्रायरचा वापर करण्यापूर्वी हा व्हिडीओ पहा; सलूनमधील आहे..., हात थरथरतील

Hair Dryer Fire Video: हेअर ड्रायरचा वापर करण्यापूर्वी हा व्हिडीओ पहा; सलूनमधील आहे..., हात थरथरतील

Next

हेअर ड्रायरचा वापर आजकाल सारेच करतात. प्रत्येक घरात आता ही वस्तू आढळते. घरातील मुली, महिला केस सुकविण्यासाठी याचा वापर करतात. सलूनमध्ये तर दररोजचेच आहे. पण आता एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो पाहून तुम्ही हेअर ड्रायरने केस सुकवायचे सोडा, हातात घेण्याचाही विचार करणार नाही. घाबरू नका, पण सावध रहावे लागेल. 

जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यात हेअर ड्रायर जिवघेणा ठरत असल्याचे दिसत आहे. सलूनमध्ये या हेअर ड्रायरचा स्फोट होतो आणि दुकानात केस कापण्यासाठी आलेल्या तरुणाला आगीने वेढल्याचे दिसत आहे. हा भयानक व्हिडीओ आहे. 

या व्हिडीओमध्ये केशकर्तन करणारा गिऱ्हाईकाच्या केसांना शेप देण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करताना दिसत आहे. यावेळी तो त्याच्या हाताने ड्रायर तापलाय की नाही ते तपासत आहे. यानंतर त्याने ड्रायरची गरम हवा गिऱ्हाईकाच्या डोक्याकडे वळविताच त्यातून मागून पुढून आगीचा लोळ उठताना दिसत आहे. या ड्रायरची आग गिऱ्हाईकाच्या डोक्यावर फेकली जाते, त्यामुळे त्याच्या केसांना आग लागते. या आगीत काही सेकंदांत आजुबाजुला आग लागल्याचे दिसत आहे. हा तरुण किंचाळताना ऐकू येत आहे. 

ड्रायरचा स्फोट झाल्यावर न्हावी तिथून पळ काढतो, परंतू खूर्चीत बसेलल्या गिऱ्हाईकाच्या डोक्याला आगीने वेढलेले असते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. ते लोक आता पुन्हा कधीच ड्रायर वापरणार नाहीत असे काही म्हणत आहेत. 

हा धक्कादायक व्हिडिओ कोणत्या शहरातील आहे, ड्रायर फुटल्यानंतर त्या तरुणाची आणि न्हाव्याची प्रकृती कशी आहे, त्यांना दुखापत कितपत झालीय, याची काहीही माहिती मिळालेली नाही. परंतू, हा व्हिडीओ हेअर ड्रायर वापरणाऱ्यांसाठी धोक्याची जाणीव करून देणारा आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर, लोक सोशल मीडियावर म्हणत आहेत की कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरण्यापूर्वी, त्याचे वायरिंग तपासले पाहिजे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओची सत्यता पटलेली नाही.

Web Title: Hair Dryer Fire Video: Hair dryer blows fire; both barber, customer in flames, Shocking Video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.