जगाचा पोशिंदा कधी जिद्द नाही हरला; एक पाय नसतानाही शेतात राबला, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 12:34 PM2020-09-18T12:34:33+5:302020-09-18T12:53:41+5:30
शेतकऱ्यानं आपला एक पाय गमावला आहे. अशा स्थितीतही भर पावसात चिखलातून एका पायाचा आधार घेत बळिराजानं आपलं काम सुरू ठेवलं आहे.
बळीराजा म्हणजे सगळ्या जगाचा पोशिंदा. सोशल मीडियावर एका शेतकऱ्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. बळीराज्याच्या मेहनतीमुळे आपण दोनवेळचं अन्न खाऊ शकतो. रात्रंदिवस राबणाऱ्या बळीराज्याला आपलं रोजचं काम करतानाही अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अनेक ग्रामीण भागात फारश्या सोईसुविधा उपलब्ध नसतात. तर कधी ऋतूबदलांमुळे पीकांवर संकट ओढावतं. अशा स्थितीतही हिंमत हारता शेतकरी आपलं काम सुरू ठेवतात.
No words can do justice to this video.
— Madhu Mitha, IFS (@IfsMadhu) September 17, 2020
Thank you. pic.twitter.com/Qqj6P4kXtz
एका शेतकऱ्यानं आपला एक पाय गमावला आहे. अशा स्थितीतही भर पावसात चिखलातून एका पायाचा आधार घेत बळिराजानं आपलं काम सुरू ठेवलं आहे. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात रोज काम करून कंटाळला असाल किंवा कष्ट करण्यापासून लांब पळण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी नक्की प्रेरणादायी ठरेल. आयएफएस अधिकारी मधुमिथा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शन दिलं आहे की, या व्हिडीओतील शेतकऱ्याला शब्दांनी न्याय दिला जाऊ शकत नाही.
तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता. एक पाय नसतानाही शेतात हा बळीराजा राबत आहे. न डगमगता उत्साहात आणि जद्दीने बळीराजानं आपलं काम सुरू ठेवलं आहे. या व्हिडीओला २ लाखांपेक्षा जास्त व्हिव्हज मिळाले आहेत. १६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे तर ३ हजार लोकांना हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. हा व्हिडीओ कुठला आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. हा व्हिडीओ पाहून अनेकजण निशब्द झाले आहेत.
हे पण वाचा-
शोधा म्हणजे सापडेल! केजरीवालांच्या 'या' दोन फोटोंमधील १० फरक ओळखून दाखवा
बापरे! खड्ड्यात अडकलेला ट्रक बाहेर काढायच्या नादात 'असं' काही झालं; पाहा व्हायरल व्हिडीओ
लय भारी! कोरोनाच्या भीतीनं पाणीपुरीवाल्यानं केलेला जुगाड पाहून म्हणाल; वाह क्या बात है...