Hanuman Chalisa Viral Video: हातात गिटार अन् मुखी हनुमान चालिसा... विदेशी गायिकेचा हा Video एकदा बघाच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 07:48 PM2022-10-12T19:48:04+5:302022-10-12T19:49:11+5:30
या व्हिडीओला सध्या मोठ्या प्रमाणावर पसंती मिळताना दिसतेय
Hanuman Chalisa Viral Video: भारतीय संस्कृतीचे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात कौतुक केले जाते. गेल्या काही महिन्यामध्ये राज्यासह देशात हनुमान चालिसा पठणावरून बऱ्याच गोष्टी घडल्याचे पाहायला मिळाले. मशिदीवरील भोंगे उतरवले गेले नाहीत तर त्यासमोर स्पीकर्सवर हनुमान चालिसा पठण केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करणाऱ्या रवी राणा आणि नवनीत राणा या दाम्पत्याला तुरूंगवास भोगावा लागला होता. पण सध्या मात्र एका परदेशी गायिकेचा (foreigner singer) हनुमान चालीसा पठणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक परदेशी मुलगी अतिशय आनंदात हनुमान चालीसा पठण करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
हनुमान चालीसा प्रत्येकाने ऐकली असेलच. कधी मंदिरात तरी कधी चित्रपटात.. काही लोक स्वत:देखील नित्यनेमाने त्याचे पठण करत असतील. पण ही हनुमान चालिसा जर एखाद्या परदेशी व्यक्तीच्या तोंडून ऐकायला मिळत असेल तर तुम्ही भारतीय संस्कृतीचे वारसदार असल्याचा नक्कीच खूप अभिमान वाटेल. तुम्ही आजवर अनेक वेळा पारंपरिक पद्धतीत हनुमान चालिसा ऐकली असेल. पण तुम्ही गिटार वाजवत परदेशी गायिकेच्या तोंडून हनुमान चालिसा ऐकली आहेत का? जर तुम्ही अजूनही असं काही ऐकलं नसेल, तर तुम्ही या व्हिडीओ नक्कीच पाहायला हवा. पाहा व्हिडीओ-
Foreigners recite Hanuman Chalisha at Sankat Mochan Hanuman Temple, Varanasi. 😍 pic.twitter.com/cg7OF7Sml0
— The Lost Girl (@Lost_Girl_00) October 11, 2022
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक विदेशी महिला तिच्या बँडसोबत दिसत आहे. त्यांना पाहून ते एखादे इंग्रजी गाणे म्हणतील असे वाटते. मात्र ही महिला हनुमान चालिसा म्हणू लागल्यावर सारेच आश्चर्यचकित होतात. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.