एअरपोर्टवर महिलेने काढली पुरूषाची छेड, चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला; पण कुणी काहीच बोललं नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 10:04 AM2023-11-10T10:04:45+5:302023-11-10T10:05:17+5:30
ही व्यक्ती पुण्याहून दिल्लीला परत जात होती. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर एका पोस्टच्या माध्यमातून त्याच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत सांगितलं.
सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. यात जास्तीत जास्त घटना महिलांशी संबंधित असतात. क्वचितच एखाद्या पुरूषाने त्याच्यासोबत छेडछाड झाल्याचं सांगितलं असेल. पण अशीच एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने सांगितलं की, एका महिलेने एअरपोर्टवर त्याच्यासोबत छेडछाड केली. त्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. ही व्यक्ती पुण्याहून दिल्लीला परत जात होती. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर एका पोस्टच्या माध्यमातून त्याच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत सांगितलं.
त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'मी 7 नोव्हेंबर 2023 रोजी पुण्याहून दिल्लीची फ्लाइट घेणार होतो आणि साधारण 2 वाजले होते. जेव्हा झोन 1 ची बोर्डिंग सुरू झाला तेव्हा मी झोन 3 मध्ये वाट बघत होतो. तेव्हाच एक 30 ते 35 वयाची एक महिला आली आणि माझ्या बाजूला उभी राहिली. मी तिला गाणं गुणगुणत असल्याचं ऐकलं आणि त्यानंतर माझी कंबर व खालच्या भागावर हात फिरवणं सुरू केलं. नेमकं काय होतंय मला काही समजलं नाही. कारण याआधी मला असा स्पर्श कुणीच केला नव्हता. असं तिने दोनदा केलं'.
तो पुढे म्हणाला की, 'असंही नव्हतं की, मी वर्ल्ड क्लास हॉटी होतो आणि ती थर्ड क्लास महिला. ती सुद्धा दिसायला चांगली होती. मला आधी वाटलं की, मी हसून हा विषय सोडून देऊ. पण हे अजब होतं. जसं की, एका मुलीने मला छेडलं तेही दिल्ली जाताना. आपल्याकडे यासाठी कोणताही कायदा नाही आणि मला अजूनही पूर्णपणे समजलं नाही की, नेमकं काय झालं? पण मला इतकं नक्की माहीत आहे की, तिने मला मुद्दामहून छेडलं होतं'.
या पोस्टवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'कुणी रिप्लायमध्ये गंमत करत आहेत, कारण इथे एका पुरूषासोबत छेडछाड झाली. जर एखाद्या महिलेने अशी पोस्ट केली असती तर सगळे पुरूषांना टोमणे मारत असले असते. तुमच्यासोबत जे झालं त्याचं मला दु:खं आहे. केवळ तुम्ही पुरूष आहात म्हणून या घटनेची संवेदनशीलता कमी होत नाही'.