शो दरम्यानच टिकटॉक स्टारनं पाकच्या गृहमंत्र्यांना कॉल केला; Video व्हायरल, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 07:22 PM2021-11-19T19:22:11+5:302021-11-19T19:22:28+5:30
हे पहिल्यांदाच नाही जेव्हा टीकटॉक स्टार हरीम शाहमुळे शेख रशिद चर्चेत आलेत. हरीम शाहसोबत कथित संबंधावरुनही ते वादात अडकले होते.
इस्लामाबाद – प्रसिद्ध आणि वादग्रस्त टिकटॉक स्टार हरीम शाह(Hareem Shah) हीने कार्यक्रमातच पाकिस्तानच्या एका मंत्र्याला फोन लावल्यानं पुन्हा चर्चेत आली आहे. हरीम नाशापाती प्राइम नावाच्या चॅनेलवर टू बी होनेस्ट ३.० शोमध्ये भाग घेण्यासाठी पोहचली होती. या कार्यक्रमावेळी कॅमेऱ्यासमोरच तिने पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांना फोन लावला. हा शो २४ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे परंतु त्याचा टीझर यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आला आहे.
हे पहिल्यांदाच नाही जेव्हा टीकटॉक स्टार हरीम शाहमुळे शेख रशिद चर्चेत आलेत. हरीम शाहसोबत कथित संबंधावरुनही ते वादात अडकले होते. हरीम शाह तीच आहे जिने शेख रशीद यांच्यावर अश्लिल संवाद साधल्याचा आरोप केला होता. टीकटॉक स्टार हरीम शाहनं पाकिस्तानचे गृहमंत्री यांना शो दरम्यान कॉल लावला. टीझरमध्ये पाहायला मिळतं की, शोचे एँकर हरीम शाह यांना जर तुम्ही शेख रशीद यांना आता कॉल केला तर ते उचलतील का? असा प्रश्न केला. तेव्हा हरीम शाहनं करुन पाहूया. त्यानंतर तिने फोन मागितला आणि थेट गृहमंत्र्यांना कॉल लावला.
हरीम शाह शेख रशीद यांना कॉल करते तेव्हा दुसरीकडून शेख रशीद कॉल उचलत आता बिझी आहे बोलू शकत नाही. त्यावर हरीम शाह आता बोला ना. यावर शेख रशीद मी बोलू शकत नाही. त्यानंतरही हरीम शाह त्यांना बोलण्यासाठी आग्रह करते तेव्हा रागाच्या भरात शेख रशीद कॉल कट करतात. हा कार्यक्रम २४ नोव्हेंबरला पाकिस्तानात रिलीज होणार आहे. हरीम शाह याआधी जून महिन्यात अचानक लग्न केल्यानं चर्चेत आली होती. त्यावेळी तिचं लग्न सिंध प्रांतातील पाकिस्तान पीपुल्स पार्टीच्या एका आमदाराशी झालं होतं. प्रायव्हेसीचा विचार करत त्यांनी पतीचं नाव जाहीर केले नाही.
अश्लिल व्हिडीओ पाठवण्याचा आरोप
पाकिस्तानी टीकटॉक स्टार हरीम शाह हिने शेख रशीद यांच्यावर अश्लिल व्हिडीओ पाठवत असल्याचा आरोप केला होता. त्यावेळी शेख रशीद पाकिस्तानचे रेल्वे मंत्री होते. हरीम शाहने जो व्हिडीओ शेअर केला आहे त्यात तिने शेख रशीद यांना व्हिडीओ कॉल केल्याचं दिसत आहे. परंतु हरीम शाहनं हा व्हिडीओ कॉल डिलीट केला होता.