जेव्हा तुमची पत्नी फॅशन डिझायनर असते तेव्हा बेकार मास्कचा असा करेल पुन्हा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 05:49 PM2021-10-29T17:49:04+5:302021-10-29T17:51:41+5:30
हर्ष गोयनका यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवर एक व्हायरल फोटो शेअर केला आहे. हा व्हायरल फोटो शेअर करत त्यांनी सोबत फारच मजेदार कॅप्शन दिलं आहे.
कोरोना व्हायरसमुळे प्रत्येक व्यक्ती आपल्याजवळ वेगवेगळे मास्क ठेवतो. अशात जेव्हा मास्क अनेकदा वापरला गेला तर तो कचऱ्यात फेकला जातो. त्याचा वापर केला नाही. पण काही लोक असेही आहेत जे मास्कला रीयूज करून नवं स्वरूपही देतात. याचंच एक उदाहरण उद्योहगपती हर्ष गोयनका (Harsh Goenka Tweeet) यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून दिलं आहे.
हर्ष गोयनका यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवर एक व्हायरल फोटो शेअर केला आहे. हा व्हायरल फोटो शेअर करत त्यांनी सोबत फारच मजेदार कॅप्शन दिलं आहे. हर्ष यांनी त्यांच्या ट्विटरवर दोन अशा व्यक्तींचा फोटो शेअर केला आहे ज्यात दोघांनीही मास्कपासून तयार कपडे घालते आहेत. हा फोटो पाहून लोक हैराण झाले आहेत. तर हर्ष गोयनका यांचं कॅप्शन वाचून लोकांना हसू फुटलं.
When your wife is a fashion designer and you want to reuse all wasted masks…. pic.twitter.com/FxsKsKgZA1
— Harsh Goenka (@hvgoenka) October 27, 2021
त्यांनी फोटोसोबत कॅप्शन लिहिलं की, 'जेव्हा तुमची पत्नी फॅशन डिझायनर असते आणि तुम्हाला सर्वच बेकार पडलेल्या मास्कचा पुन्हा वापर करायचा असतो'. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या फोटोत लक्ष देण्यासारखी बाब म्हणजे या व्यक्तीने कोट-पॅंटप्रमाणे मास्कचा वापर केला आहे. तर सोबत असलेल्या महिलेने लॉंग शूट वन पीस घातला आहे. सोबतच महिलेने मास्कने तयार केलेली एक बॅगही घेतली आहे.