एसी रुमची सोय, ड्रायफ्रुट्सचा खुराक; १० कोटी रुपयांच्या रेड्याची बडदास्त पाहून सारेच अवाक् 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 12:29 PM2023-12-23T12:29:18+5:302023-12-23T12:31:55+5:30

राहण्यासाठी एसी रुमची सुविधा तसेच खुराकामध्ये ड्रायफ्रुट्सचा समावेश, हरियाणाच्या रेड्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगतेय. 

haryana buffalo worth rs 10 crore sell in exhibition in patana bihar dairy and catel expo video goes viral | एसी रुमची सोय, ड्रायफ्रुट्सचा खुराक; १० कोटी रुपयांच्या रेड्याची बडदास्त पाहून सारेच अवाक् 

एसी रुमची सोय, ड्रायफ्रुट्सचा खुराक; १० कोटी रुपयांच्या रेड्याची बडदास्त पाहून सारेच अवाक् 

Buffalo Worth Rs 10 Crore: भारतातील हरियाणा हे राज्य पशुपालनासाठी प्रसिद्ध मानले जाते. सध्या सोशल मीडियावर तिथल्या एका रेड्याची चांगलीच चर्चा रंगतेय. बाजारात विकण्यासाठी आणलेल्या या रेड्याकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या आहेत. 
 
हरियाणाच्या पटना शहरांमध्ये 'बिहार डेअरी आणि कॅटल एक्सपो' या तीन दिवसीय प्रदर्शनाला नुकतीच सुरूवात झाली आहे. या प्रदर्शनात देशभरातून मोठ्या प्रमाणात पशुपालन करणारे हजेरी लावतात. यंदाही या प्रदर्शनाला पशुविक्रेत्यांची झुबंड पाहायला मिळतेय. पण यापेक्षा या प्रदर्शनात १० कोटींच्या किंमतीचा रेडा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आता त्याचे छायाचित्रही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. गोलु नावाच्या या रेड्याची किंमत ऐकून पशु प्रदर्शानात आलेले शेतकरी अवाक् झाले आहेत. राहायला एसी रुम आहारात पाच किलो सफरचंद, पाच किलो चणे तसेच प्रतिदिन  २० लिटर  दुध असा खुराक या रेड्याला दिला जातो. अशी माहिती या रेड्याच्या मालकाकडून देण्यात आली. शिवाय रोज न चुकता या रेड्याची तेलाने मसाज केली जाते. यावरून या रेड्यावर केल्या जाणाऱ्या खर्चाचा अंदाज लावता येतो.

मिळालेल्या माहितीनूसार, हरियाणातील पटनामधून हा रेडा प्रदर्शनात आणण्यात आला आहे. हा रेडा मुर्रा जातीचा आहे. सोशल मीडियावर मुर्रा जातीच्या या रेड्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. या रेड्याची किंमत १० कोटी रुपये असल्याचे रेड्याच्या मालकाने सांगितले आहे. तसेच हा जगातील सर्वात महाग रेडा असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

अवघ्या ६ वर्षांच्या गोलूची शरीरयष्टी प्रदर्शनातील शेतकऱ्यांना अचंबित करणारी आहे. दरम्यान, ६ वर्षांचा रेडा गोलू-२ ही त्यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी आहे. गोलूचे आजोबा पहिल्या पिढीचे होते , त्यांचे नाव सुद्धा गोलू ठेवण्यात आले होते. त्याचा मुलगा मुलगा बीसी ४४८-१  याला गोलू-१ असे  नाव देण्यात आले. या गोलू हा नातू असून याचे नाव गोलू-२ ठेवण्यात आले आहे.

Web Title: haryana buffalo worth rs 10 crore sell in exhibition in patana bihar dairy and catel expo video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.