"हाथी मेरे साथी", पूराच्या पाण्यातून गजराजने महावतासह पार केली गंगा, पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 07:41 PM2022-07-13T19:41:39+5:302022-07-13T19:42:56+5:30
बिहारमधील वैशालीच्या राघोपूरमध्ये एका माहुताने हत्तीच्या पाठीवर बसून गंगा पार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
वैशाली: बिहारमधील वैशालीच्या राघोपूरमध्ये एका माहुताने हत्तीच्या पाठीवर बसून गंगा पार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मंगळवारी गंगा नदीत अचानक पाणी वाढल्याने राघोपूर परिसरात माहूत हत्तीसह अडकला. यानंतर माहूतने हत्तीसह गंगा पार करण्याचा निर्णय घेतला. माहुताने हत्तीच्या पाठीवर बसून नदी पार केली. यादरम्यान लोकांनी त्याचा व्हिडिओही बनवला.
“हाथी मेरे साथी” कैसे एक महावत ने हाथी और हाथी ने अपने महावत का साथ गंगा नदी में अचानक पानी का स्तर बढ़ने के बाद नहीं छोड़ा उसका एक दृश्य देखिए@ndtvindia pic.twitter.com/VAi2EgwyYl
— manish (@manishndtv) July 13, 2022
हत्तीचा कान धरून बसला
गंगेच्या जोरदार लाटांमधून हत्ती पोहत होता. यादरम्यान, जीव मुठीत धरलेल्या माहुताने हत्तीचे कान धरले. या दोघांनी नदीच्या लाटांचा सामना करत नदी पार केली. सुमारे एक किलोमीटर गंगेत पोहल्यानंतर हत्ती आणि माहुत सुरक्षितपणे गंगा पार करून जेठुकी घाटावर आले.
माहुताकडे ना पैसा होता ना अन्न
स्थानिक लोकांनी सांगितले की, मंगळवारी माहुत हत्ती घेऊन आला होता. अचानक गंगेचे पाणी वाढले आणि दोघेही अडकले. हत्तीला वाचवण्यासाठी मोठ्या बोटीची गरज होती. पण, माहुताकडे फारसे पैसे नव्हते. यामुळेच त्याने हत्तीसोबत नदी पार करण्याचा निर्णय घेतला.