अजगराला झाडावर चढताना पाहिलंय..? व्हिडिओ पाहून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 04:51 PM2022-10-05T16:51:14+5:302022-10-05T17:23:55+5:30

सध्या सोशल मीडियावर एका भल्यामोठ्या अजगराचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

Have you seen a python climbing a tree..? Your eyes will be amazed by the video! | अजगराला झाडावर चढताना पाहिलंय..? व्हिडिओ पाहून थक्क व्हाल!

अजगराला झाडावर चढताना पाहिलंय..? व्हिडिओ पाहून थक्क व्हाल!

googlenewsNext

Social Media Viral: सोशल मीडियावर दररोज प्राण्यांचे विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओंमध्ये अनेकदा साप किंवा अजगराचे धक्कादायक व्हिडिओही असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक भलामोठा अजगर(Python) झाडावर चढताना दिसत आहे, हे दृष्य पाहून तुमच्या अंगावर शहारे उभे राहतील.

ड्रॅगनप्रमाणे झाडावर चढला

Reddit या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीय. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीच्या धाडसाचे कौतुक कराला. या व्हिडिओमध्ये एक भलामोठा अजगर आगळ्या-वेगळ्या पद्धतीने झाडावर चढताना दिसत आहे. 

व्हिडिओ पाहून अनेकजण चक्रावले
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या काही सेकंदांच्या व्हिडिओला अनेकांनी (सोशल मीडिया यूजर्स) लाइक केले आहे. तसेच, कमेंट सेक्शनमध्ये अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देताना दिसले. तुम्हीही पाहा या अजगराचा व्हिडिओ.

Web Title: Have you seen a python climbing a tree..? Your eyes will be amazed by the video!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.