पेरलं तर उगवतंच! कॅन्सरग्रस्त शिक्षकाप्रती विद्यार्थांनी व्यक्त केली कृतज्ञता; ह्रदयद्रावक गायनाचा 'Video' व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 12:58 PM2024-01-20T12:58:13+5:302024-01-20T13:01:11+5:30
एक चांगला शिक्षक मेणबत्तीप्रमाणे असतो, स्वतः जळून विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळून टाकतो असं म्हटल तर काही वावगं ठरणार नाही.
Social Viral : सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. चित्तथरारक कसरतींचे किंवा स्टंबाज करणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातच काही असेही व्हिडीओ समोर येतात जे पाहून डोळे पाणवल्याशिवाय राहत नाही.
सध्या सोशल मीडियावर एका कॅन्सर पीडित शिक्षकाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून एका शिक्षकाचे त्यांच्या विद्यार्थांच्या आयुष्यातील योगदानाचे स्मरण करुन देतो. या व्हिडीओमध्ये ४०० विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकासाठी गायलेल्या गाण्याचा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच भावलाय. साधारणत: वर्षभरापूर्वी एका एक्स यूजरने हा व्हिडीओ शेअर केला असल्याची माहिती मिळतेय. पण अलिकडेच सोशल मीडियावर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होताना दिसतोय. विद्यार्थी आणि शिक्षक आणि यांच्यामधील सुंदर नात्याची प्रचिती देणारा या व्हिडीओ पाहून कोणालाही अश्रू अनावर होतील. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या दृढ नात्याचा परिचय देणारा हा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
टेनेसीच्या नॅशविल येथील क्राइस्ट प्रेस्बिटेरियन अकादमीच्या विद्यार्थ्यांना गायलेल्या गाण्याची ही एक हृदयस्पर्शी क्लिप आहे. कॅन्सरसारख्या भयानक आजाराने पीडित असलेल्या आपल्या शिक्षकाला भेटण्यासाठी हे ४०० विद्यार्थी एकत्र एकवटल्याचं पाहायला मिळत आहे. त्यादरम्यान शिक्षक बेन एलिस आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रकृतीची खबरबात देताना दिसतायत. खिडकीतून ते शिक्षक जेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात तेव्हा एका सुरात हे विद्यार्थी गाणं म्हणायला सुरुवात करतात. हे ४०० विद्यार्थी शिक्षक बेन एलिस यांच्या घराबाहेर जमले आणि त्यांच्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करणारं गाणं बोलत आहेत.
पाहा व्हिडीओ :
400 students gather outside the home of their cancer-stricken teacher to sing for him. He passed away 10 days later pic.twitter.com/raYmpK1196
— Historic Vids (@historyinmemes) January 18, 2024
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कमेंट्स केल्या आहेत, “या व्हिडिओने माझा माणुसकीवरील विश्वास पुन्हा निर्माण केला. शिवाय ते शिक्षक यामुळे खूप आनंदी असतील.” अशा प्रतिक्रिया देखील एका नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.