माणुसकीला काळीमा फासणारी घटना; जखमी मोराला मदत करण्याऐवजी लोकांनी ओरबाडली पिसे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 03:41 PM2024-09-15T15:41:20+5:302024-09-15T15:42:11+5:30

रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या मोराच्या अंगावरुन निर्दयी लोकांनी सर्व पिसे ओरबाडून काढली.

heartless people scratched injured peacocks feathers | माणुसकीला काळीमा फासणारी घटना; जखमी मोराला मदत करण्याऐवजी लोकांनी ओरबाडली पिसे

माणुसकीला काळीमा फासणारी घटना; जखमी मोराला मदत करण्याऐवजी लोकांनी ओरबाडली पिसे

Viral Video : मोर आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. मोराला मारणे अथवा त्याची तस्करी करणे कायद्याने गंभीर गुन्हा आहे. तरीदेखील मोराची पिसे बाजारात मोठ्या प्रमाणात विकली जातात. लोक स्वतःच्या फायद्यासाठी कुठल्याही थराला जातात. कधी मेलेल्या मोराची पिसे उपटली जातात, तर कधी पिसांसाठी मोराला मारले जाते. सध्या सोशल मीडियावर माणूसकिला काळीमा फासणारा व्हिडिओ व्हायरल होतोय, जो तुमचाही संताप होईल. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर माणूस किती नीच आहे, असे तुम्हाला वाटेल.

माणुसकी मेली...
मोर हा आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी असून, त्याचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मात्र या व्हिडिओमध्ये दिसणारे लोक मोराचे रक्षण करण्याऐवजी त्याला अतिशय क्रुरतेने मारताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त मोर रस्त्यावर पडला होता, त्याला उपचाराची नितांत गरज होती. मात्र, या जखमी मोराला मदत करण्याऐवजी लोकांनी अतिशय क्रुरतेने त्याची सर्व पिसे उपटून नेली. त्या मोराच्या अंगावरील एक ना एक पंख उपटून त्याला त्याच अवस्थेत तिथे सोडून दिले. 

पाहा video-

सोशल साइट X वर @anitavladivoski नावाच्या युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जखमी मोराच्या अंगावरील पिसे ओरबाडून काढणारी निर्दयी माणसांची झुंबड दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांचा संताप उडाला. अनेकांनी कमेंट करून मोराची पिसे लुटणाऱ्यांना राक्षस म्हटले. तसेच, या सर्व लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी काहींनी केली. दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, ही माहिती मिळू शकलेली नाही.

Web Title: heartless people scratched injured peacocks feathers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.