Anand Mahindra : तिचा मृत्यू व्यर्थ ठरणार नाही, तिनं आयुष्यावर प्रेम करायला शिकवलं; आनंद महिंद्राही झाले भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 12:41 PM2021-05-15T12:41:03+5:302021-05-15T12:42:17+5:30

कोरोना संकटातही जगायचं कसं, हे आपल्याला 30 वर्षीय तरुणीनं शिकवलं. कोरोनाविरुद्धचा लढा तिनं गमावला असला तरी आयुष्यावर प्रेम करण्याचा मोलाचा सल्ला ती देऊन गेली.

Her death will not go in vain...We will remember to love Zindagi, Anand Mahindra pay tribute to brave girl | Anand Mahindra : तिचा मृत्यू व्यर्थ ठरणार नाही, तिनं आयुष्यावर प्रेम करायला शिकवलं; आनंद महिंद्राही झाले भावुक

Anand Mahindra : तिचा मृत्यू व्यर्थ ठरणार नाही, तिनं आयुष्यावर प्रेम करायला शिकवलं; आनंद महिंद्राही झाले भावुक

Next

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं सर्वांना हादरून सोडलं आहे. ऑक्सिजनची कमतरता, रेमडेसेवीर इंजेक्शनचा तुटवडा या बातम्या वारंवार वाचल्यानं अवतीभवती जणू नकारात्मक वातावरणच निर्माण झालेले पाहायला मिळत आहे. पण, या संकटातही जगायचं कसं, हे आपल्याला 30 वर्षीय तरुणीनं शिकवलं. कोरोनाविरुद्धचा लढा तिनं गमावला असला तरी आयुष्यावर प्रेम करण्याचा मोलाचा सल्ला ती देऊन गेली. महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा ( Anand Mahindra) यांनीही त्या तरुणीच्या जाण्याचा शोक व्यक्त केला. तिचा मृत्यू व्यर्थ जाणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

कोण होती ती?
दिल्लीतील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 30 वर्षीय युवतीचा व्हिडिओ डॉ. मोनिका लंगेह यांनी 8 मे रोजी ट्विटरवरुन शेअर केला होता. त्यामध्ये, तोंडाला ऑक्सिजन लावून बेडवर लव्ह यू जिंदगी... हे गाणं ही तरुणी ऐकत होती, या गाण्याच्या सूरांसोबतच ती लयबद्ध डान्सही करताना व्हिडिओत दिसत आहे. 


डॉ. मोनिका लंगेह यांनी पुन्हा एकदा या मुलीसंदर्भातील ट्विट करत, माफी मागितली आहे. आपण, या ब्रेव्ह गर्लला वाचवू शकलो नाहीत. तिच्या कुटुंबीयांना आणि लहान मुलांना हे दु:ख पचविण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थनाही डॉ. मोनिका यांनी केली आहे. 13 मे रोजी रात्री 9.30 वाजता या मुलीचा मृत्यू झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या मुलीच्या व्हिडिओमुळे अनेकांनी तिच्या इच्छाशक्तीचं आणि मनोधैर्याचं कौतुक केलं होतं. मात्र, तिच्या निधनाच्या वृत्ताने सोशल मीडिया हळहळला आहे. 

आनंद महिंद्रा काय म्हणाले?
कोरोना व्हायरस किती क्रूर आहे. तिचा मृत्यू व्यर्थ जाणार नाही. तिनं आपल्याला आयुष्यावर प्रेम करणं शिकवलं... 

Read in English

Web Title: Her death will not go in vain...We will remember to love Zindagi, Anand Mahindra pay tribute to brave girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.