तेरी मेहरबानिया! रस्त्यावर पडलं होतं नवजात मुलं; मुक्या जनावरानं पाहताच वाचवला चिमुकल्याचा जीव
By manali.bagul | Published: January 28, 2021 12:27 PM2021-01-28T12:27:52+5:302021-01-28T12:38:40+5:30
कुत्रा जुमरेल यांना एका डम्प साईटवर घेऊन आला. त्याठिकाणी एक लहानसं गठूडं पडलं होतं. जुमरेल यांनी जेव्हा हे पाहिलं तेव्हा तो आश्चर्यचकीत झाले, कारण त्या गठूड्यात एक नवजात मुलं होतं.
(Image Credit- Pics/Hope for Strays)
सोशल मीडियावर मुक्या प्राण्यांच्या वेगवेगळ्या घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. एका नवजात मुलाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही कहाणी तुम्हाला फिल्मी वाटेल पण हे खरं आहे. नेहमीप्रमाणे जुमरेल फंन्टेस रेवीला आपली मोटारसायकल घेऊन फिलीपींसच्या सेबू पर्वतांवरून जात होते. तेवढ्यात अचानक एक कुत्रा समोर आला आणि त्यांच्या मागे मागे धावू लागला. त्याच्या जोरजोरात भुंकण्याच्या आवाजावरून त्याला काहीतरी सांगायचं आहे हे लक्षात आलं.
जेव्हा कुत्र्यानं भूकणं बंद केलं नाही तेव्हा जुमरेलला संशय आला. त्यानंतर त्यांनी बाईक थांबवली आणि कुत्र्याच्या मागे जाऊ लागले. कुत्रा जुमरेल यांना एका डम्प साईटवर घेऊन आला. त्याठिकाणी एक लहानसं गठूडं पडलं होतं. जुमरेल यांनी जेव्हा हे पाहिलं तेव्हा तो आश्चर्यचकीत झाले, कारण त्या गठूड्यात एक नवजात मुलं होतं. कुत्र्यानं प्रसंगावधान दाखवल्यामुळे एका नवजात बाळाला वाचवण्यात यश आलं. सुदैवानं हे लहान मुलं अतिशय निरोगी आणि चांगले होते.
जुमरेलनं या घटनेची माहिती लगेचच पोलिसांना दिली. नवजात बाळापर्यंत कसा पोहोचलो, कुत्र्यानं कशाप्रकारे भुंकण्यास सुरूवात केली. याबाबत सविस्तर माहिती पोलिसांना देण्यात आली. ब्लॅकी नावाच्या कुत्र्यावर सध्या सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. लोकांनी म्हटलं आहे की, 'सगळेच हिरो टोपी घालत नाहीत टोपी घालणारे सगळेच माणसं हिरो नसतात.'
कमालच केली राव! कुत्र्यासाठी सुरू होता वधुचा शोध; अन् काश्मिरमधून आलं स्थळ
सुरूवातीला ब्लॅकी भटक्या कुत्र्याप्रमाणे असल्याचे समजलं गेलं त्यानंतर एका संस्थेमार्फत ब्लॅकीचे लोकेशन शोधण्यात आले. त्यानंतर लक्षात आलं की, हा कुत्रा एका कुटुंबासोबत राहत होता. पण त्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खूपच हालाखीची होती. त्यांना पुन्हा आपला कुत्रा मिळाल्यानंतर त्यांनी त्याच्या हूशारीचे आणि प्रामाणिकपणाचे कौतुक केले आहे. वाह रे नशीब! २० वर्षांपासून बिल्डींगमध्ये साफसफाई करायची; अन् एकेदिवशी घरच गिफ्ट मिळालं