Holi 2021 : 'हे' मॅसेजेस पाठवून आपल्या जवळच्यांना द्या होळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा....!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 10:33 AM2021-03-27T10:33:13+5:302021-03-27T10:33:47+5:30
Holi Marathi Viral Messages : हे काही अस्सल मराठमोळे मॅसेज, शुभेच्छापत्रं (Holi Messages) पाठवून तुम्ही पाठवून होळीचा सण साजरा करू शकता.
Holi Marathi Viral Messages : उद्या २८ मार्च रोजी भारतभर होळीचा (Holi 2021) सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार. आपल्यासोबत आपल्याच जवळच्या व्यक्तींसाठी सुद्धा हा सण आनंद आणि सुख घेऊन यावा असं तुम्हाला वाटत असेल. हा तुमचा विचार तुमच्या त्या आवडत्या आणि जवळच्या व्यक्तींपर्यंत पोचवायचा असेल तर त्यासाठी त्यांना या दिवसाच्या शुभेच्छा देणं एकदम सोपं आहे.
सध्या प्रत्यक्ष भेटून दिलेल्या शुभेच्छांच्या इतकेच डिजिटल शुभेच्छांना(Holi Marathi Messages) सुद्धा महत्व प्राप्त झाले आहे त्यामुळे, तुम्हाला सुद्धा जर का, Whatsapp Status, Facebook Images किंवा अन्य सोशल मीडिया मार्फत शुभेच्छा द्यायच्या असतील, तर हे काही अस्सल मराठमोळे मॅसेज, शुभेच्छापत्रं (Holi Messages) पाठवून तुम्ही पाठवून होळीचा सण साजरा करू शकता.
होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
होळी संगे केरकचरा जाळू
झाडे वाचवू अन् कचरा हटवू
निसर्ग रक्षणाचे महत्त्व पटवू
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
ईडापीडा दु:ख जाळी रे
आज वर्षाची होळी आली रे
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
लाल रंग तुमच्यासाठी गालांसाठी
काळा रंग तुमच्या केसांसाठी
निळा रंग तुमच्या डोळ्यांसाठी
पिवळा रंग तुमच्या हातांसाठी
गुलाबी रंग तुमच्या होठांसाठी
पांढरा रंग तुमच्या मनासाठी
हिरवा रंग तुमच्या आरोग्यासाठी
होळीच्या या सार रंगांसोबत
तुमचे जीवन रंगून जावो...
हार्दिक शुभेच्छा
भिजू दे रंग अन् अंग स्वछंद
अखंड उठु दे मनी रंग तरंग...
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळूया आज हे रंग...
रंगपंचमीचा सण रंगांचा
आगळ्या-वेगळ्या ढंगाचा
वर्षाव करी आनंदाचा.
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा.
आपल्या आयुष्यात वेगवेगळे रंग बहरो
सुखाच्या रंगांनी आयुष्य रंगबिरंगी होवो!
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा…
खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगांमध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा
होळीच्या अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य व शांति नांदो.
होळी सणाच्या खूप खूप शुभेच्छा!
फाल्गुन मासी आली होळी
खायला मिळणार पुरणाची पोळी
रात्री देऊ मनसोक्त आरोळी
राख लावूनी आपल्या कपाळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
रंग प्रेमाचा
रंग स्नेहाचा
रंग नात्यांचा
रंग बंधाचा
रंग हर्षाचा
रंग उल्हासाचा
रंग नव्या उत्सवाचा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.