Hospital waiting : हृदयद्रावक! रुग्णालयाबाहेर आजारी पतीसह ८ तास वाट पाहिली; तरीही मिळाला नाही बेड, अन् मग.......
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 02:01 PM2021-05-05T14:01:16+5:302021-05-05T14:31:26+5:30
Hospital waiting : ज्या नवीन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तेथे अनेक बेड्स रिक्त आहेत, असा पत्नीचा आरोप आहे.
(Image Credit- Bhaskar.com)
कोरोनाकाळात जगभरातील लोकांना संकटांचा सामना करावा लागत आहे. बेड्सची कमतरता, ऑक्सिजनचा तुटवडा, औषधांची टंचाई यांमुळे सगळयांवरच गंभीर स्थिती ओढावली आहे. दरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. राजस्थानातील कोरोना पॉझिटिव्ह जोडप्याने ८ तास रुग्णालयातच्या बाहेर अंथरुणावरच काढले. तरीही बेड उपलब्ध झाला नाही. यानंतर, एकच गोंधळ उडाला. दरम्यान, ज्या नवीन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तेथे अनेक बेड्स रिक्त आहेत, असा पत्नीचा आरोप आहे.
महिलेनं दिलेल्या माहितीनुसार माझ्या पतीची प्रकृती खालावत असूनही भरती करण्यास टाळाटाळ केली जात होती. प्रथम आम्ही एमबीएस रुग्णालयात 4 तास थांबलो. पण प्रवेश मिळाला नाही. तेथून नवीन रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आले. रुग्णवाहिकेसाठी तासभर फिरलो पण सुविधा मिळाली नाही. नवीन रुग्णालयात गेल्यानंतर तिथंही बेडसाठी संघर्ष करावा लागला.
सदर घटनेतील आजारी माणसाची पत्नी रामनगर देवलीमांझी येथिल रहिवासी असून ती गेल्या 11 वर्षांपासून अंगणवाडी आशा सेविका आहे. कोरोना दरम्यान, ती डोर-टू-डोअर सर्व्हेच्या कामात व्यस्त होती. तिचा नवरा सत्यप्रकाश बैरवा या दोघांचीही कोरोना टेस्ट झाली आणि मंगळवारी हे दोन्हींचे अहवाल सकारात्मक आले. कोरोनाशी लढण्यासाठी आयुष मंत्रालयानं दिले घरगुती उपाय; इम्यूनिटी वाढवण्याचा सोपा फंडा
मंगळवारी दुपारी तीन वाजता एमबीएस उपचारासाठी पोहोचल्याचे ज्ञानूबाई यांनी सांगितले की, त्यावेळी पतीची सेच्यूरेशन लेव्हल 88 होती. श्वास घेण्यास अडचण होती त्यानंतर डॉक्टरांनी भरती करण्यास सांगितले. पण ४ तास रुग्णालयाच्या बाहेर बसल्यानंतरही बेड मिळाला नाही. त्यावेळी जवळपास ७ वाजले होते. अखेर काही लोक या जोडप्याच्या मदतीसाठी पुढे आले आणि ८ तासांनी बेड उपलब्ध झाला. अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार