Shocking! पर्यटकांसह पॅराशुट धाडकन् जमिनीवर कोसळले, धक्कादायक दुर्घटना कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 02:12 PM2021-10-14T14:12:33+5:302021-10-14T14:13:40+5:30

आकाशात झेपावलेला हॉट एअर बलून (Hot Air Balloon) हवेतच क्रॅश झाला, त्यानंतर त्यातील प्रवासीही खाली पडले. इटलीमध्ये (Italy) ही धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

hot air balloon accident in Italy shocking accident video goes viral | Shocking! पर्यटकांसह पॅराशुट धाडकन् जमिनीवर कोसळले, धक्कादायक दुर्घटना कॅमेऱ्यात कैद

Shocking! पर्यटकांसह पॅराशुट धाडकन् जमिनीवर कोसळले, धक्कादायक दुर्घटना कॅमेऱ्यात कैद

Next

सध्या बऱ्याच पर्यनटनस्थळी रिव्हर राफ्टिंग, पॅराग्लायडिंग, बंजी जम्पिंग असे बरेच अ‍ॅडव्हेंचर गेम्स (Adventure Games) खेळायला मिळतात.  धाडसी किंवा उत्साही पर्यटक याचा आनंद घेतातच. पण जीव धोक्यात टाकणारे हे खेळ चांगलेच महागात पडू शकतात. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

आकाशात झेपावलेला हॉट एअर बलून (Hot Air Balloon) हवेतच क्रॅश झाला, त्यानंतर त्यातील प्रवासीही खाली पडले. इटलीमध्ये (Italy) ही धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोमोमध्ये काही पर्यटक हॉट एअर बलूनमध्ये बसून उंच आकाशात उडण्याचा आनंद घेत होते. तेव्हा हवेत एअर बलूनचा बॅलेन्स बिघडला आणि त्यानंतर बलून तिथं असलेल्या झा़डांमधून जात म्युझियमला धडकला. माहितीनुसार एअर बलून जास्त उंच केला नव्हता. त्यामुळे झाडांच्या फांद्यांना हा बलून अडकला आणि ही दुर्घटना झाली. यानंतर बलूनला असलेलं बास्केट म्युझियमजवळ पूर्णपणे उलटं झालं आणि त्यातील प्रवासी खाली पडले.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार जेव्हा हा बलून म्युझियमच्या छतावर आपटला तेव्हा म्युझियम बंद होतं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. यानंतर अग्निशमन दलाच्या टीमने बलूनला खाली उतरवलं. सुदैवाने कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. पण प्रत्येक वेळी नशीब साथ देईलच असं नाही. काही दिवसांपूर्वीच एका तरुणीचा बंजी जम्पिंग करताना मृत्यू झाला होता.

Web Title: hot air balloon accident in Italy shocking accident video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.