How to live longer : वयाची शंभरी पार करायचं सिक्रेट माहित्येय का? या सवयीमुळे ८५ वर्षांपेक्षा जास्त काळ जगतात लोक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 04:55 PM2021-03-15T16:55:24+5:302021-03-15T17:05:30+5:30
How to live longer : या गोष्टीचे आपल्याला पुरावे नक्कीच सापडतील की आशावादी आणि सकारात्मक विचारसरणी लोकांचे आयुष्य वाढवू शकते.'
सकारात्मक विचार फक्त आपल्याला प्रगतीशील बनवत नाहीत तर आपलं वय वाढण्यामागेही मोठी भूमिका बजावत असतात. 'दि बॉस्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन' नं दिलेल्या माहितीनुसार आपल्या सकारात्मक विचारांचा आरोग्यावर परिणाम होतो. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सकारात्मक विचारांनी जगणारे लोक ८५ पेक्षा जास्त आयुष्य जगतात.
डॉ. लेविना यांनी एक्सप्रेस युकेशी बोलताना सांगितले की, ''या गोष्टीचे आपल्याला पुरावे नक्कीच सापडतील की आशावादी आणि सकारात्मक विचारसरणी लोकांचे आयुष्य वाढवू शकते.'' या अभ्सासात ६९,७४४ महिला आणि १,४२९ पुरूषांचा समावेश होता. ज्यांनी आपली सकारात्मक विचारसरणी, संपूर्ण आरोग्य आणि वेगवेगवळ्या सवयींबाबत अभ्यास केला होता.
यात महिलांचे आरोग्य आणि विचार करण्याच्या क्षमतेचे १० वर्षांपर्यंत निरिक्षण करण्यात आलं होतं. पुरूषांच्या सवयी, विचार करण्याची पद्धत, विचारात घेण्यात आली होती. यात असं दिसून आलं की, दिलखुलासपणे जीवन जगत असलेल्यांचे वय १५ टक्के जास्त असते.
या अभ्यासानुसार सकारात्मक विचार ठेवत असलेल्या ७० टक्के लोकांमध्ये ८५ वर्षांपेक्षा जास्त जगण्याची संभावना होती.
वय, शैक्षणिक पात्रता, डिप्रेशन, अल्कोहोलचे सेवन, व्यायाम, डाएट आणि प्रायमरी केअर या गोष्टींवर लक्ष देता संशोधक या निष्कर्षापर्यंत पोहोचले होते. याआधीही अनेक अभ्यासातून मृत्यूची जोखिम कमी करत असलेल्या कारणांवर प्रकाश टाकण्यात आला होता. CoronaVirus News : धोका वाढला! शरीरात १२ आठवडे पडून राहतोय कोरोना; तज्ज्ञांनी सांगितली लॉन्ड कोविडची लक्षणं.....
कसं खुश राहायचं
नॅशनल हेल्थ सर्वे (NHS) दिलेल्या माहितीनुसार रोजच्या जीवनात सकारात्मक दृष्टीकोन ठेवायला हवा. तसंच ताण तणाव कमीत कमी घ्यावा. व्यायाम , स्ट्रेचिंग करून तुम्ही आपलं शरीर चांगलं ठेवू शकता. याव्यतिरक्त श्वसनाचे व्यायाम, टाईम मॅनेजमेंटचा वापर करून तुम्ही ताणतणाव मुक्त राहू शकता. मानसिक आणि भानविक स्वरूपात आनंदी राहण्यासाठी तुम्हाला जे आवडतं ते करण्याच प्रयत्न करा. संतुलित आहार घ्या, कुटुंबातील व्यक्तींसह आपल्या प्रियजनांना वेळ द्या. Healthy Breakfast Ideas : कमी कॅलरीजसह पौष्टीक नाष्ता करायचा असेल तर हे ५ पर्याय ठरतील बेस्ट ऑप्शन; फिट राहण्याचा सोपा फंडा