'या' फोटोत ३ अंक कितीवेळा लिहिलाय?; डोळ्यांनी फसवलं, बऱ्याच जणांना चुकवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 10:36 PM2022-04-04T22:36:18+5:302022-04-04T22:45:30+5:30
सोशल मीडियावर हा फोटो खूप शेअर केला जात आहे. मित्रमंडळी एकमेकांना हा फोटो पाठवून त्यांना टास्क देत आहेत.
सोशल मीडियावर सध्या ऑप्टिकल इल्यूशन म्हणजे डोळ्यांना फसवणारे अनेक फोटो व्हायरल होत असतात. परंतु अलीकडेच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्याला पाहून तुमचेही डोळे धोका खातील. हा फोटो शेअर करून एक प्रश्न विचारला जात आहे. या फोटोत तुम्हाला किती ३ दिसतात. विशेष म्हणजे सुरुवातीला अनेकांनी फोटो पाहून चुकीचं उत्तर दिले आहे.
व्हायरल होणाऱ्या या फोटोत मोबाईल किपॅडचा स्क्रिनशॉट्स आहे. त्यासोबत डायल पॅडवर काही नंबर लिहिलेले दिसून येत आहेत. या फोटोत तुम्हाला नेमके किती ३ दिसतात असं फोटो शेअर करून सांगितले जात आहे. योग्य उत्तर देणाऱ्याला इंटरनेट युजर्स जीनियस प्रतिक्रिया देत कौतुक करत आहेत. परंतु बहुतांश लोकांना या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्यात अपयश आले आहे. तुम्हीही हा फोटो पाहून बरोबर उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकता. अनेकांनी हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु बरोबर उत्तर काहीच लोकं देऊ शकले.
सोशल मीडियावर हा फोटो खूप शेअर केला जात आहे. मित्रमंडळी एकमेकांना हा फोटो पाठवून त्यांना टास्क देत आहेत. पहिल्यांदा हा फोटो जो कुणी पाहतो तो चुकीचं उत्तर देतो. जर तुम्हीही पहिल्यांदा फोटो पाहत असाल तर तुमचं उत्तरं १५, १८. अथवा २१ असेल. तुम्ही या निष्कर्षावर पोहचला का? ज्याचं बहुतांश सोशल मीडिया युजर्सनं उत्तर दिले आहे. परंतु आता विचार करण्यासारखी बाब म्हणजे अखेर याचं योग्य उत्तर आहे तरी काय? त्यासाठी तुम्हाला हा फोटो पुन्हा पाहावा लागेल.
‘हे’ आहे योग्य उत्तर
जेव्हा तुम्ही पहिल्यांदा हा फोटो पाहिला तेव्हा एकूण १८ वेळा ३ हा आकडा नजरेस पडला असेल. परंतु फोटोत आणखी एक ३ आकडा लपला आहे जो ४ अंकाच्या खाली I च्या जागी आहेत. त्यामुळे या फोटोत एकूण ३ आकडे १९ वेळा लिहिलेले आहेत.