80 वर्षांआधी किती होती विंटेज कारची किंमत, आकडा वाचून बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 16:40 IST2024-12-17T16:28:27+5:302024-12-17T16:40:40+5:30

सध्या सोशल मीडियावर यासंबंधी काही फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यातून विटेंज कार त्यावेळी किती रूपयांना मिळत हे दिसून येतं.

How much did a vintage car cost 80 years ago? see old viral advertise | 80 वर्षांआधी किती होती विंटेज कारची किंमत, आकडा वाचून बसेल धक्का!

80 वर्षांआधी किती होती विंटेज कारची किंमत, आकडा वाचून बसेल धक्का!

Vintage Chevrolet: लक्झरी आणि विंटेज कारची क्रेझ अनेकांमध्ये बघायला मिळते. पण आजकाल साध्या कारच्याही किंमती आकाशाला भिडत आहेत. तर विंटेज कार तर त्याहून महाग मिळतात. मात्र, या विटेंज कार जुन्या काळात किती रूपयांना मिळत होत्या हे अनेकांना माहीत नसेल. सध्या सोशल मीडियावर यासंबंधी काही फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यातून विटेंज कार त्यावेळी किती रूपयांना मिळत हे दिसून येतं. यात शेवरोले कारची किंमत दाखवण्यात आली आहे. जी बघू लोक अवाक् झालेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये विटेंज शेवरोले कारची जाहिरात आहे. यावर या कारची दिलेली किंमत पाहून लोकांचं चक्रावून गेलं आहे. शेवरोले कार व्हायरल झालेल्या फोटोवर त्यांची किंमत 2,700 रूपये आणि 3,675 रूपये आहे. आजच्या काळात साधारण 5 ते 6 लाख रूपये.

5 सीटर शेवरोले कारच्या जाहिरातीतील किंमत पाहून लोक हैराण झाले आहेत. तसेच या कार लखनौ, कोलकाता, दिल्ली आणि डिब्रूगढ़ असल्याचं सांगण्यात आलं आहे. या पोस्टवर लोक अनेक मजेदार कमेंट्सही करत आहेत. ज्यात एकाने लिहिलं की, '1936 मध्ये सोनं प्रति ग्रॅम 20 रूपये होतं'. दुसऱ्याने लिहिलं की, '2,700 रूपये त्या काळातील 2 कोटी रूपयांच्या बरोबर आहे'. 

Web Title: How much did a vintage car cost 80 years ago? see old viral advertise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.