७० वर्षाआधी किती होता सोन्याचा भाव? जुनं बिल पहाल तर व्हाल अवाक्!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 12:32 PM2024-08-05T12:32:22+5:302024-08-05T12:33:20+5:30

Gold Old Bill: सोशल मीडियावर एक सोनाराचं एक जुनं बिल व्हायरल झालं आहे. त्यातून कळून येतं की, त्यावेळी सोन्याचे भाव किती होते

How much was the price of gold 70 years ago, see old bill | ७० वर्षाआधी किती होता सोन्याचा भाव? जुनं बिल पहाल तर व्हाल अवाक्!

७० वर्षाआधी किती होता सोन्याचा भाव? जुनं बिल पहाल तर व्हाल अवाक्!

Gold Old Bill: सध्या सोन्याचे भाव आकाशाला भिडले आहेत. सोनं घ्यायचं म्हटलं तरी खूप विचार करावा लागतो. सोन्याचा विषय निघाला की, अनेकांना असाही प्रश्न पडतो की, ६०-७० वर्षाआधी सोन्याचे किती भाव असतील? हे जाणून घेण्याची सगळ्यांनाच उत्सुकता असते. याच प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. तेही पुराव्यासोबत. आज सोन्याच्या एका ग्रॅमची किंमत इतकी जास्त आहे की, त्यावेळचे लोक तेवढ्या पैशात १०० ग्रॅम पेक्षा जास्त सोनं खरेदी करू शकत होते.

७० वर्षाआधीचा सोन्याचा भाव

सोशल मीडियावर एक सोनाराचं एक जुनं बिल व्हायरल झालं आहे. त्यातून कळून येतं की, त्यावेळी सोन्याचे भाव किती होते. हे बील १९५९ सालातील आहे. त्यावेळी सोन्याची किंमत ११३ रूपये असायची. हे बिल जर बारकाईने पाहिलं तर दिसेल की, हे जुनं बिल पुणे येथील सोनाराचं आहे आणि त्यावर दुकानाचं नावंही लिहिलं आहे. सगळ्यात वर वामन निंबाजी अष्टेकर लिहिलं आहे. तर त्यावर तारीख ३ मार्च १९५९ लिहिलेलं आहे. 

ज्या व्यक्तीने सोनं खरेदी केलं आहे त्याचं नाव शिवलिंग आत्माराम असं लिहिलं आहे. सोन्यासोबत त्यांनी चांदीचीही खरेदी केली आहे. हे बिल फारच जुन आहे. पण आज बिलाची किंमत खूप जास्त आहे. लोकांनी जसं हे जुनं बिल पाहिलं लोक हैराण झालेत. लोकांना विश्वास बसत नाहीये की, सोनं आधी इतकं स्वस्त होतं. 

केवळ दोन दिवसांआधी इन्स्टाग्रामवर सोन्याचं हे जुनं बिल शेअर करण्यात आलं आहे. 'जिंदगी गुलजार है' नावाच्या इन्स्टा अकाऊंटवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या पोस्टला ६९ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर लोक यावर वेगवेगळ्या आणि मजेदार कमेंट्सही करत आहेत. 

Web Title: How much was the price of gold 70 years ago, see old bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.