अनेकदा स्वच्छ करूनही टॉयलेट सीटवरील पिवळे डाग जात नाहीत? लगेच करा 'हे' सोपे उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 12:01 PM2024-08-29T12:01:02+5:302024-08-29T12:18:36+5:30
Tips for cleaning toilet seat: बरेच लोक नेहमीच तक्रार करतात की, अनेकदा स्वच्छता करूनही टॉयलेट सीटवर स्वच्छ होत नाही किंवा त्यावरील पिवळे-काळे डाग निघत नाहीत.
Tips for cleaning toilet seat: घराची स्वच्छता फार महत्वाची असते. कारण याने आजार आणि इन्फेक्शनचा धोका कमी होतो. घरातील काही भागांची स्वच्छता फार जास्त महत्वाची ठरते. खासकरून टॉयलेट आणि टॉयलेट सीट. टॉयलेट सीटची स्वच्छता खूप महत्वाची असते. यातून अनेक गंभीर आजार पसरण्याचा धोका असतो. पण बरेच लोक नेहमीच तक्रार करतात की, अनेकदा स्वच्छता करूनही टॉयलेट सीटवर स्वच्छ होत नाही किंवा त्यावरील पिवळे-काळे डाग निघत नाहीत. अशात आज आम्ही तुम्हाला टॉयलेट सीट स्वच्छ करण्यासाठी काही सोपे उपाय सांगणार आहोत.
टॉयलेट सीट चमकदार कशी ठेवाल?
बेकिंग पावडर
बेकिंग पावडरचा वापर तुम्ही टॉयलेट सीटची स्वच्छता करण्यासाठी करू शकता. यासाठी चार चमचे बेकिंग सोडा पाडवर अर्धा कप पाण्यात मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट सीटवर सगळीकडे पसरवा. अर्ध्या तासानंतर ब्रशच्या मदतीने सीट क्लीन करा. डाग दूर झालेले दिसतील आणि सीट चमकदार दिसेल.
ग्लिसरीन आणि व्हिनेगर
टॉयलेट सीट चमकदार करण्यासाठी तुम्ही ग्लिसरीन आणि व्हिनेगर वापरू शकता. यासाठी एक कप ग्लिसरीनमध्ये व्हाईट व्हिनेगर मिक्स करा आणि त्यात थोडं लिंबू पिळा. हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये टाकून सीटवर स्प्रे करा. काही वेळ ते तसंच राहू द्या नंतर ब्रशने सीट साफ करा.
बोरेक्स पावडर आणि लिंबू
बोरेक्स पावडर आणि लिंबाच्या मदतीने टॉयलेट सीट स्वच्छ केली जाऊ शकते. चार चमचे बोरेक्स पावडरमध्ये लिंबाचा रस टाकून मिक्स करा आणि ही पेस्ट सीटवर पसरवा. काही वेळाने ब्रशच्या मदतीने सीट साफ करा. नंतर पाणी टाका.
क्लीनिंग टॅबलेट्स
आजकाल बाजार टॉयलेट क्लीनिंग टॅबलेट्स मिळतात. या टॅबलेट्समध्ये असे केमिकल्स असतात जे टॉयलेट सीटवर घाण, डाग आणि बॅक्टेरिया दूर करतात. या टॅबलेट्स कशा वापराव्या याची माहिती पॅकेटवर दिलेली असते.