देवघरातील टाइल्सवरील काळे लगेच होतील दूर, जाणून घ्या सोपे घरगुती उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 12:02 PM2024-10-21T12:02:20+5:302024-10-21T12:04:47+5:30
Cleaning Tips : अडचण तेव्हा जास्त वाढते जेव्हा काही ठिकाणांवर स्वच्छतांवर करण्यास जास्त वेळ लागतो आणि मेहनतही जास्त लागते.
Cleaning Tips : सध्या सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरू आहे. लोक बाजारात खरेदी करण्यासोबतच घरांची स्वच्छताही करत आहे. अशात घराच्या कानाकोपऱ्याची स्वच्छता करत असताना लोकांना अनेक अडचणी येतात. अडचण तेव्हा जास्त वाढते जेव्हा काही ठिकाणांवर स्वच्छतांवर करण्यास जास्त वेळ लागतो आणि मेहनतही जास्त लागते.
घरातील असंच एक ठिकाण म्हणजे देवघरातील टाइल्स, रोज पूजा केल्यावर यात दिवा लावल्या जात असल्याने येथील टाइल्सवर काळे आणि चिकट डाग लागतात. ही टाइल्स स्वच्छ करणं महत्वाचं असतं. दिवाळीची पूजा करताना ही टाइल किंवा एकंदर देवघर सुंदर आणि स्वच्छ दिसावं यासाठी येथील टाइल क्लीन करण्यासाठी आम्ही काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.
टाइल्स क्लीनिंगसाठी वस्तू
अर्धा चमचा डिटर्जेंट पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, एक ईनो पॅकेट, एक ग्लास पाणी हे साहित्य लागेल. आता सगळ्यात आधी एका भांड्यात एक ग्लास पाणी टाकून त्यात अर्धा चमचा डिटर्जेंट पावडर आणि बेकिंग सोडा मिक्स करा. नंतर त्यात एक छोटं ईनो पाउच टाका. या गोष्टी चांगल्या मिक्स करा. हे मिश्रण देवघरातील टाइल्स स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता.
स्वच्छ करण्याची पद्धत
टाइल्स स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात आधी टाइल्सवर सगळ्यात आधी पाणी टाकून 10 मिनिटे तसंच राहू द्या. याने भेंगामधील धूळ, माती, राख, जाळ्या फुलतात आणि स्वच्छता करण्यास सोपं जातं. आता तुम्ही तयार केलेलं मिश्रण टाइल्सवर सगळीकडे पसरवा. ते 10 मिनिटे तसंच राहू द्या. 10 मिनिटांनी एका ब्रशच्या मदतीने टाइल्स घासा आणि नंतर पाण्याने स्वच्छ करा. टाइल्स चमकदार आणि नवीन दिसेल.
आणखी काही टिप्स
- लिंबाचा आणि बेकिंग पावडरचं मिश्रण तयार करून देवघरातील टाइल्स क्लीन करू शकता.
- बेकिंग पावडर, डिशवॉशिंग लिक्विड गरम पाण्यात मिक्स करून टाइल्सवरील दिव्याच्या आसेचे काळे डाग दूर करू शकता. याने टाइल्सवरील चिकटपणाही दूर होईल.
- व्हाईट विनेगर आणि पाण्याचं मिश्रणही तुम्ही टाइल्स स्वच्छ करण्यासाठी वपरू शकता. यानेही टाइल्स चमकदार आणि नवीन दिसेल.