घासून घासून कॉलर फाटते पण डाग जात नाहीत? लगेच करा 'हे' सोपे-स्वस्त उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 01:03 PM2024-10-07T13:03:19+5:302024-10-07T13:24:56+5:30
How to Clean Shirt collar : बरेच लोक हे डाग दूर करण्यासाठी वेगवेगळे डिटर्जेंट, लिक्विडचा वापर करतात. कॉलर फाटते, पण डाग काही जात नाही.
How to Clean Shirt collar : अनेक पांढरं शर्ट किंवा लाइट कलरचे शर्ट एकापेक्षा जास्त वेळ किंवा एकदाही वापरले तरी घाम आणि धूळ-मातीमुळे यांची कॉलर काळी होते. घामामुळे कॉलरवरील डाग आणि घट्ट बसतात. अनेकदा घासूनही हे डाग जात नाहीत. बरेच लोक हे डाग दूर करण्यासाठी वेगवेगळे डिटर्जेंट, लिक्विडचा वापर करतात. कॉलर फाटते, पण डाग काही जात नाही. अशात कॉलरवरील काळे डाग दूर करण्यासाठी आम्ही काही सोपे आणि स्वस्त उपाय सांगणार आहोत.
१) बेकिंग सोडा आणि पाणी
बेकिंग सोडा एक नॅचरल क्लीनर आहे. जे डाग दूर करण्यासाठी फार फायदेशीर ठरतं. यासाठी २ ते ३ चमचे बेकिंग सोड्यामध्ये थोडं पाणी टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट कॉलरवरील डागांवर लावा आणि ३० मिनिटे तशीच ठेवा. नंतर हलक्या हाताने घासत शर्ट पाण्याने धुवा. डाग हळूहळू हलके होतील आणि शर्टही स्वच्छ दिसेल. काही वेळा हा उपाय कराल तर डाग दूर होतील.
२) व्हाइट व्हिनेगर आणि पाणी
व्हिनेगर सुद्धा घामाचे डाग दूर करण्याचा एक बेस्ट उपाय आहे. थोडं व्हाईट व्हिनेगर घ्या आणि त्यात थोडं पाणी मिक्स करा. हे मिश्रण डागांवर ३० मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर सामान्य साबण किंवा डिटर्जेंटच्या मदतीन शर्ट धुवा. तुम्हाला फरक दिसेल.
३) लिंबाचा रस आणि मीठ
लिंबामध्ये नॅचरल ब्लीचिंग एजंट्स असतात, जे डाग दूर करण्यास मदत करतात. शर्टच्या कॉलरवर लिंबाचा रस लावा आणि नंतर वरून थोडं मीठ टाका. काही वेळासाठी हे तसंच राहू द्या. नंतर हलक्या हाताने घासा. शर्ट धुतल्यावर तुम्हाला फरक दिसेल.