भारीच! पाण्याच्या टाकीजवळ 'हा' डिव्हाईस जोडा, कडक उन्हाळ्यात पाणी थंड राहील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 12:50 PM2023-04-24T12:50:10+5:302023-04-24T12:52:14+5:30
उन्हाळ्याच्या दिवसात छतावरील पाण्याच्या टाकीतील पाणी गरम झालेले असते. आता हे पाणी थंड ठेवण्यासाठी एक डिव्हाईस जोडता येतो.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे छतावर ठेवलेल्या पाण्याच्या टाकीतील पाणीही गरम होत आहे. पण, आता टाकीतील पाणी प्रचंड उष्णतेतही थंड राहील. यासाठी टाकीजवळ वॉटर चिलर डिव्हाईस बसवावा लागेल. हे डिव्हाईस तुम्ही बसवल्यास तुम्हाला हवे तेव्हा थंड पाणी मिळणार आहेत. कडक उन्हातही तुमच्या टाकीतील पाणी थंड राहू शकते.
या वॉटर चिलर प्लांटची क्षमता १ टन आहे. हे व्हाइट सिंगल फेज १ मध्ये येते. याची उर्जा क्षमता ०.५ ते 5HP आहे. हे एअर कूल्ड उपकरण आहे. त्याची किंमत सुमारे ४५,००० रुपये आहे. वॉटर चिलरची मोटर पॉवर 0.5HP ते 5HP पर्यंत असते. तसेच तापमान श्रेणी २५० अंश सेल्सिअस आहे.
या डिव्हाईसची किंमत ४५ हजार रुपये आहे, त्यामुळे हे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. हे डिव्हाईस एखादी मोठी असणारी फॅमिली जोडू शकते. छोट्या ऑफिससाठी हे उपकरण योग्य आहे.
Bikini Girl चा हॉट अंदाज, बिबट्यासोबत केला बिनधास्त वॉक; बघून व्हाल अवाक्...
यापेक्षा अजुन काही स्वस्तातील जुगाड आहेत. पाण्याच्या टाकीच्या बाजूला थर्माकॉल लावले तर पाणी थंड राहू शकते. कारण थर्माकॉल गरमी टाकीपर्यंत पोहोचू देत नाही. तर दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याची टाकी जिथे गरमी लागत नाही तिथे ठेवली पाहिजे.पाण्याच्या टाकीत बर्फ टाकला तरीही तापमान कंट्रोलमध्ये राहते.