किचनमधील तेलाचे आणि चिकट डाग लगेच होतील दूर, जाणून घ्या काही सोपे उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 02:59 PM2024-09-07T14:59:05+5:302024-09-07T14:59:47+5:30
Kitchen Oil Stains Cleaning Tips:किचनमधील डबे, खिडकी, भिंती, फॅन आणि टाइल्सवरही हे डाग लागतात. अशात हे डाग दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत.
Kitchen Oil Stains Cleaning Tips: किचनमध्ये तेलाचे डाग लागणं किंवा खरकटं चिकटून राहणं तर स्वाभाविक आहे. पण हे डाग जर वेळीच स्वच्छ केले नाही तर नंतर ते काढणं फार अवघड होऊन बसतं. तेलाच्या डागांवर आणखी धूळ, कचरा बसतो आणि ते अधिक घट्ट होतात. हे डाग दिसायला तर विचित्र वाटतातच सोबतच इतरही गोष्टी खराब होतात. किचनमधील डबे, खिडकी, भिंती, फॅन आणि टाइल्सवरही हे डाग लागतात. अशात हे डाग दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत.
बेकिंग सोडा
भिंतींवरील तेलाचे डाग दूर करण्यासाठी थोडा बेकिंग सोडा घ्या आणि तो पाण्यात मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट डागांवर लावा आणि सुकू द्या. नंतर हे डाग कोरड्या कापडाने घासून स्वच्छ करा.
पांढरी टूथपेस्ट
पांढरी टूथपेस्टने किचनमधील हे तेलकट डाग दूर करण्यास मदत मिळते. ही पेस्ट डागांवर लावून काही मिनिटे तशीच ठेवा आणि नंतर ओल्या कापडाने साफ करा.
बेबी पावडर
बेबी पावडर तेल शोषूण घेण्यास मदत करतं. अशात किचनमधील डाग दूर करण्यासाठी डागांवर थोडं बेबी पावडर टाका आणि काही तास तसंच राहू द्या. नंतर एका स्वच्छ कापडाने हे डाग पुसून घ्या.
व्हिनेगर
व्हिनेगर एक अॅसिड असतं जे तेलाचे डाग दूर करण्यास मदत करतं. व्हिनेगर पाण्यात मिक्स करा. हे मिश्रण तेलाच्या डागांवर लावा आणि काही मिनिटे तसंच ठेवा. त्यानंतर ओल्या कापडाने डाग पुसून घ्या.
लिंबू, राख आणि व्हिनेगर
राख, लिंबू आणि व्हिनेगरची एक पेस्ट तयार करा. याने डाग दूर होण्यास मदत मिळेल. ही पेस्ट डागांवर लावा आणि काही मिनिट तशीच राहू द्या. त्यानंतर डाग ओल्या कापडाने स्वच्छ करा.