किचनमध्ये लागलेले तेलाचे चिकट डाग झटपट होतील दूर, लगेच वापरा हे सोपे घरगुती उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 02:48 PM2024-08-07T14:48:37+5:302024-08-07T14:49:22+5:30
Kitchen Tips : धुरामुळे फॅनवरही चिकट पदार्थाचा थर जमा होतो. यामुळे घर तर खराब होतंच सोबतच याची दुर्गंधीही येते.
Kitchen Tips : किचनमध्ये स्वयंपाक करत असताना तेलाच्या शिंतोड्यांमुळे अनेक वस्तू खराब होतात. तसेच तेल भिंतीवर उडाल्याने त्यांवर धूळ जमा होते आणि काळपटपणा येतो. गॅसचा ओटाही चिकट होतो. हे डाग सहजपणे दूर होत नाहीत. धुरामुळे फॅनवरही चिकट पदार्थाचा थर जमा होतो. यामुळे घर तर खराब होतंच सोबतच याची दुर्गंधीही येते.
अशात हे तेलाचे डाग दूर करणं फार गरजेचं असतं. हे अवघड काम सोपं करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही किचन तेलाचे डाग दूर करू शकता आणि किचन चमकवू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही महागड्या प्रॉडक्टची गरज पडणार नाही.
व्हिनेगर
व्हिनेगर हे एक अॅसिड असतं. जे तेलाचे डाग दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं. याचा वापर करण्यासाठी व्हिनेगर पाण्यात मिक्स करा. हे पाणी तेलाचे डाग असलेल्या ठिकाणी टाका आणि काही मिनिटे तसंच राहू द्या. आता डाग भिजलेल्या कापडाने घासून काढा.
लिंबू आणि सोडा
लिंबू आणि बेकिंग सोडा दोन्हीही क्लीनिंग एजंट म्हणून वापरले जातात. याचा वापर करण्यासाठी एका लिंबाचे दोन भाग करा. डागांवर लिंबू घासून साफ करा. नंतर एक कापड सोड्याच्या पाण्यात भिजवून डाग असलेली जागा साफ करा.
बेबी पावडर
तुम्हाला कदाचित अंदाजही नसेल पण बेबी पावडर तेल शोषूण घेण्यास मदत करतं. त्यामुळे तेलाचे डाग दूर करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. अशात डाग असलेल्या जागेवर बेबी पावडर टाका आणि काही वेळ तसंच राहू द्या. नंतर एका कापडाच्या मदतीने डाग घासून काढा.
डिशवॉश लिक्विड
तेलाचे डाग लगेच दूर करण्यासाठी एका वाटीमध्ये गरम पाण्यात २ मोठे चमचे डिशवॉश लिक्विड मिक्स करा. आता एका स्पंजच्या मदतीने डाग असलेल्या जागेवर घासा. शेवटी एक कापड पाण्यात भिजवा आणि डाग असलेली जागा धुवून घ्या.