फळ-भाजी विक्रेते वजनात असा करतात झोलझाल, व्हिडीओ बघून व्हाल तुम्ही हुशार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 01:03 PM2024-06-25T13:03:42+5:302024-06-25T13:06:47+5:30

Viral Video : एक व्हिडीओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्ही बघू शकता की, दुकानदार कशाप्रकारे कमी असलेलं वजन जास्त दाखवतात.

How vegetable vendor frauds in fruits or vegetable weight | फळ-भाजी विक्रेते वजनात असा करतात झोलझाल, व्हिडीओ बघून व्हाल तुम्ही हुशार!

फळ-भाजी विक्रेते वजनात असा करतात झोलझाल, व्हिडीओ बघून व्हाल तुम्ही हुशार!

Viral Video : सामान्यपणे जेव्हाही आपण बाजारात भाजी किंवा फळं घेण्यासाठी जातो तेव्हा बऱ्याच दुकानदारांकडे इलेक्ट्रॉनिक वजन काटा दिसतो. पण काही असेही असतात ज्यांच्याकडे जुना तराजू असतो. वजन कमी केल्यावरून अनेक लोकांचे वादही होतात. कधी दगड टाकून, तर कधी पारड्याला चुंबक लावून हे लोक झोलझाल करतात. आज असाच एक व्हिडीओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्ही बघू शकता की, दुकानदार कशाप्रकारे कमी असलेलं वजन जास्त दाखवतात. यातून तुम्ही नक्कीच सतर्क व्हाल. हे लोक ग्राहकांना कसं फसवतात हे बघून तुम्हीही अवाक् व्हाल.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती टोपल्यामध्ये चिक्कू विकत आहे. जेव्हा तो चिक्कूचं वजन करतो तेव्हा तो चिक्कू टाकलेल्या पारड्याची चेन वरच्या बाजूने अडकवतो. यामुळे पारडं खाली येतं आणि वजन कमी असून सुद्धा जास्त दाखवतं. लोक फार लक्ष देत नसल्याने फसतात आणि त्यांना नेमकं काय झालं हेही समजत नाही.

हा व्हिडीओ इन्स्टावर @imranmalik077 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. एका व्यक्तीच्या हे लक्षात आलं आणि त्याने गमतीने हा व्हिडीओही बनवला. व्हिडीओवर लोकांच्या खूप कमेंट्स येत आहेत. एकाने लिहिलं की, काकाने स्कॅमपासून वाचण्याची पद्धत सांगितली आहे. दुसऱ्याने लिहिलं की, आता या फसवणूक म्हणावी की विकणाऱ्याचं स्किल. तिसऱ्याने लिहिलं की, याला तर माझ्या प्रोफेसर पेक्षाही जास्त स्किल माहीत आहे. 

Web Title: How vegetable vendor frauds in fruits or vegetable weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.