जांभळाच्या लाकडाचा तुकडा टाकल्याने खराब होणार नाही पाण्याची टाकी, जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 04:25 PM2024-10-05T16:25:37+5:302024-10-05T16:26:44+5:30
Water Tank Cleaning Tips : जांभळाची फांदी किंवा लाकडाबाबत असा दावा केला जातो की, ही पाण्याच्या टाकीमध्ये टाकल्यास १०१ वर्षापर्यंत यातील खराब होत नाही.
Water Tank Cleaning Tips : पाण्याची टाकीची सफाई करणं कुणासाठीही डोकेदुखीचं काम असतं. अनेक दिवस जर टाकी स्वच्छ केली नाही तर त्यामध्ये शेवाळ आणि गाळ जमा होतो. ज्यामुळे टाकीमध्ये बॅक्टेरियाही जमा होतात. तुमची ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला फार जुना आणि फायदेशीर उपाय सांगणार आहोत. हा उपाय म्हणजे जांभळाची फांदी किंवा लाकडाचा तुकडा. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जांभळाची फांदी किंवा लाकडाबाबत असा दावा केला जातो की, ही पाण्याच्या टाकीमध्ये टाकल्यास १०१ वर्षापर्यंत यातील खराब होत नाही. नक्कीच तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, असं कसं? तेच जाणून घेऊया.
का खराब होत नाही पाणी?
जांभळाच्या लाकडामध्ये किंवा फांदीमध्ये नॅचरल अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-फंगल गुण असतात. जे पाण्यातील नुकसानकार बॅक्टेरिया आणि बुरशी नष्ट करण्यात मदत करतात. यामुळेच जांभळाच्या झाडाच्या फांदीचा तुकडा पाण्याच्या टाकीत टाकल्यानंतर शेवाळ आणि इतर डाग जमा होत नाहीत. याने पाणी खराब होण्यापासून बचाव होतो.
कसा कराल वापर?
पाण्याची टाकी आतून खराब होण्यापासून वाचण्यासाठी तुम्हाला केवळ जांभळाच्या झाडाची फांदी किंवा छोटं लाकूड आणायचं आहे. ही फांदी चांगली स्वच्छ करा आणि पाण्याच्या टाकीत टाका. यानंतर तुम्हाला अनेक महिने पाण्याची टाकी आतून स्वच्छ करण्याची गरज पडणार नाही. जर शेवाळ किंवा बुरशी व्यतिरिक्त आणखी जमा होत असेल जसे की, क्षार तर तुम्हाला टाकी साफ करावीच लागेल.
फार जुना आहे उपाय
जांभळाच्या फांदीची खास बाब ही आहे की, ही फार मजबूत असते आणि पाण्यातही सडत नाही. ज्यामुळेच जांभळाच्या लाकडाचा वापर नाव बनवण्यासाठी केला जातो. आधी लोक विहिरी किंवा मटक्यांमध्ये याचं लाकूड टाकत होते. यांचे आरोग्यालाही भरपूर फायदे मिळतात. असा दावा केला जातो की, जुन्या काळामध्ये लोकांचं आयुष्य वाढत होतं.