... म्हणून सापाने स्वतःलाच खाण्यास सुरूवात केली; पाहा धक्कादायक व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 05:01 PM2019-08-14T17:01:08+5:302019-08-14T17:13:17+5:30

सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर खरचं काटा येईल. व्हिडीओमध्ये एका सापाने चक्क स्वतःलाच खाल्लं आहे.

Hungry snake eaten half his body video is going viral | ... म्हणून सापाने स्वतःलाच खाण्यास सुरूवात केली; पाहा धक्कादायक व्हिडीओ

... म्हणून सापाने स्वतःलाच खाण्यास सुरूवात केली; पाहा धक्कादायक व्हिडीओ

Next

सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर खरचं काटा येईल. व्हिडीओमध्ये एका सापाने चक्क स्वतःलाच खाल्लं आहे. अहो काहीही नाही... खरचं या सापाने स्वतःच स्वतःला खाल्लं आहे. अगदी भंडावून सोडणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर अत्यंत व्हायरल होत आहे. रेपटाइल सेंच्युरीमध्ये एका सापाला अत्यंत भूक लागली होती. त्याला काहीही खायला मिळालं नाही. जेव्हा त्याला भूक सहन झाली नाही, त्यावेळी त्याने स्वतःलाच खायला सुरुवात केली. 

फॉरगॉटन फ्रेंड रेपटाइल सेंचुरीने फेसबुकवर व्हिडीओ शेअर केला आहे. या लाइव्ह व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, साप स्वतःलाच खात आहे. व्हिडीओमध्ये फेसबुक पेजचे टिम मेंबर जेथ रोथहॅकर सांगत आहेत की, किंग स्नेकला जेव्हा भूक लागते, त्यावेळी तो इतर सापांना खाऊन टाकतो आणि जर इतर सापही मिळाला नाही तर तो स्वतःलाच खायला सुरुवात करतो. 

पाहा व्हिडीओ : 

रोथहॅकर यांनी सांगितले की, 'सापाला जेव्हा भूक लागते आणि को आपली शेपटी बघतो, त्यावेळी दुसरा साप समजुन तो शेपटी खाण्यास सुरुवात करतो. काही वेळाने त्यांना समजतं की, ते स्वतःलाच खात आहेत.' आज आम्ही अशाच किंग स्नेकला पाहिलं. 

साप स्वतःलाच खात असल्याचे टिम मेंबर्सच्या लक्षात आलं त्यावेळी त्यांनी सापाचा जीव वाचवला. याबाबत सांगताना त्यांनी सांगितलं की, साप जेव्हा स्वतःला खात असतो त्यावेळी जर कोणी त्याचं नाक दाबलं तर त्याचा श्वास गुदमरतो आणि तो जे खात असतो ते तोंडातून बाहेर काढतो. 

Web Title: Hungry snake eaten half his body video is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.