VIDEO : पती-पत्नी कारमध्ये बसले अन् अचानक ५० फूट उंचीवरून बर्फाचा मोठा तुकडा कारवर पडला आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 03:59 PM2021-04-01T15:59:06+5:302021-04-01T16:02:19+5:30
कोकाच्या आर्कटिक चौकीच्या एका इमारतीवरून बर्फाचा एक मोठा तुकडा पडला. कपल या अपघातात पूर्णपणे सुरक्षित राहिले. पण थोडीही चूक झाली असती तर कदाचित चित्र वेगळं असतं.
सोशल मीडियावर नेहमीच विचित्र अपघातातून चमत्कारिकपणे वाचलेल्या लोकांचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. ते म्हणतात ना वेळ आली नसेल की, माणूस कशातूनही वाचतो. अशीच एक घटना रशियातून समोर आली आहे. इथे एका कपल मरता मरता वाचलं आहे. त्यांच्यासोबत झालेल्या घटनेचा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसेल.
रशियातील एक कपल त्यांच्या कारमध्ये बसलं आणि त्यांच्या कारवर बर्फाचा एक मोठा तुकडा येऊन पडला. हे काही क्षणातच झालं. हा बर्फाचा तुकडा ५० फूट उंचीवरून त्यांच्या कारवर आदवळा. त्यामुळे त्यांच्या कारची विंडस्क्रीन तुटली.
लाडब्लिबलच्या रिपोर्टनुसार, कोकाच्या आर्कटिक चौकीच्या एका इमारतीवरून बर्फाचा एक मोठा तुकडा पडला. कपल या अपघातात पूर्णपणे सुरक्षित राहिले. पण थोडीही चूक झाली असती तर कदाचित चित्र वेगळं असतं. (हे पण बघा : आरारारा खतरनाक! बाइकवरून तिघे निवांत जात होते, समोर आला बिबट्या; पुढे जे झालं ते फोटोत बघाच....)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, कपल त्यांच्या निसान मुरानो कारमधून घाबरून उतरताना दिसत आहेत. ड्रायव्हरकडे गिअर बदलण्याचाही वेळ नव्हता. त्यामुळे कार मागे आपोआप जाताना दिसत आहे. महिला कारला ब्रेक मारण्याचा प्रयत्न करते. तर माणूस इतके तिकडे पळू लागतो. तो घाबरलेला आहे.