पती-पत्नीचं इतकं यूनिक नाव तुम्ही कधी ऐकलं-वाचलं नसेल, फोटो पाहून चक्रावले लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 02:46 PM2021-12-20T14:46:43+5:302021-12-20T14:48:53+5:30

Viral Photo : असाच यूनिक नाव असलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका वयोवृद्ध महिलेचं नाव चक्क भाजीवरून ठेवलं आहे.

Husband and wife unique name photo goes viral on social media | पती-पत्नीचं इतकं यूनिक नाव तुम्ही कधी ऐकलं-वाचलं नसेल, फोटो पाहून चक्रावले लोक

पती-पत्नीचं इतकं यूनिक नाव तुम्ही कधी ऐकलं-वाचलं नसेल, फोटो पाहून चक्रावले लोक

Next

सगळ्याच आई-वडिलांना आपल्या बाळाचं नाव यूनिक ठेवायचं असत.  काही नावं अशी असतात जे फार ऐकायला मिळत नाहीत. कोणतंही यूनिक नाव ऐकलं तर लोक लगेच त्याचा अर्थही विचारतात. यूनिक नावांचा (Unique Name) ट्रेन्ड अलिकडे आलाय. आधी यूनिक नावाची अशी काही फार क्रेझ बघायला मिळत नव्हती. जे नाव म्हणायला सोपं जात होतं ते ठेवलं जात होतं. कधी कधी तर अशी नावं ठेवली जात होती की त्यांचा अर्थ जाणून घेतल्यावर हसू येत होतं. असाच यूनिक नाव असलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Social Viral Photo) झाला आहे. एका वयोवृद्ध महिलेचं नाव चक्क भाजीवरून ठेवलं आहे.

पती-पत्नीचं अजब नाव पाहून लोक हैराण

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यावर एका वयोवृद्ध महिलेचा फोटो आहे आणि या महिलेचं नाव असं आहे की, लोक पोट धरून हसत आहेत. एका बॅंकेच्या पासबुकवर महिलेचं नाव 'धनिया' असं लिहिलं आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, धनिया म्हणजे कोथिंबीरीचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. पण असं नाव कसं असू शकतं? असा प्रश्न लोकांना पडलाय आणि त्यामुळे लोक हसत आहेत.

पती-पत्नीचं नाव धनिया आणि पुदीना

पत्नीचं नाव धनिया हे काय कमी होतं तर पतीचं नाव या पासबुकवर पुदीना आहे. काही लोकांना हे पासबुक फेक वाटत आहे. आता खरंच असं काही आहे याचा दावा आम्हीही करत नाहीत. असंही होऊ शकतं की, हा फोटो फोटोशॉप केला असेल. पण सध्या हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे कारण पती-पत्नी नाव धनिया आणि पुदीना आहे. 
 

Web Title: Husband and wife unique name photo goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.