कोर्टात घटस्फोटाची सुनावणी सुरू असतानाच पती पत्नीला पाठीवर घेऊन पळाला आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 01:30 PM2024-10-02T13:30:10+5:302024-10-02T13:31:03+5:30
पती-पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. या केसची सुनावणीवर सुरू होती. तेव्हाच ही अजब घटना घडली.
जगभरातून रोज पती-पत्नीच्या वादाच्या अनेक अजब घटना समोर येत असतात. अनेकदा तर घटस्फोटांची फार विचित्र कारणेही समोर येत असतात. काही घटना तर अशा असतात ज्यांवर विश्वासही बसत नाही. सध्या चीनमधील अशाच एका अजब घटनेची चर्चा तेथील सोशल मीडियावर रंगली आहे.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, पती-पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. या केसची सुनावणीवर सुरू होती. तेव्हाच ही अजब घटना घडली. पतीने त्याच्या पत्नीला पाठीवर उचललं आणि कोर्टाबाहेर धावत गेला. फॅमिली कोर्टात सुनावणी सुरू असताना झालेला हा प्रकार पाहून सगळेच अवाक् झाले.
चीनच्या सिचुआन प्रांतात राहणाऱ्या कपलचं लग्न २० वर्षाआधी झालं होतं. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. नुकताच पतीने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. पती दारू पिऊन तिला मारहाण करतो अशी तिची तक्रार आहे. तसेच आता या नात्यात काहीच राहिलं नाही, असंही ती म्हणाली. प्रकरण कोर्टात गेल्यावरही त्यांना घटस्फोट मिळत नव्हता. कारण कोर्टाचं म्हणणं होतं की, पती-पत्नीमध्ये अजूनही खोलवर भावनात्मक नातं शिल्लक आहे आणि ते एकत्र येऊ शकतात.
इतकंच नाही तर कोर्टाने असंही सांगितलं की, पतीला घटस्फोट नकोय. अशात पत्नीने उच्च न्यायालयात अपील केली. सुनावणी सुरू झाली तेव्हा पती भावनात्मक रूपाने हैराण झाला होता. अशात पतीने पत्नीला पाठीवर उचललं आणि पळून गेला. यादरम्यान पत्नी ओरडत होती. हा सगळा प्रकार बघून सगळे लोक हैराण झाले. नंतर पतीने कोर्टात माफीनामा लिहून दिला आणि पती-पत्नीमधील वादही मिटला. पत्नी पतीला पुन्हा एक संधी देण्यासाठी तयार झाली.