Video - हृदयस्पर्शी! कॅन्सरशी लढा देत असलेली बायको ढसाढसा रडली, नवऱ्याने दिला आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 03:31 PM2023-09-04T15:31:38+5:302023-09-04T15:41:25+5:30

एक पुरुष कॅन्सरशी लढा देत असलेल्या पत्नीचे केस कापत आहे. यावेळी त्याची पत्नी ढसाढसा रडत आहे. तिचे सर्व केस कापल्यानंतर तो देखील त्याचे केस कापतो

husband supports wife who fighting cancer shaves his own head in solidarity emotional video viral | Video - हृदयस्पर्शी! कॅन्सरशी लढा देत असलेली बायको ढसाढसा रडली, नवऱ्याने दिला आधार

Video - हृदयस्पर्शी! कॅन्सरशी लढा देत असलेली बायको ढसाढसा रडली, नवऱ्याने दिला आधार

googlenewsNext

सोशल मीडियावर एक इमोशनल व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक पुरुष कॅन्सरशी लढा देत असलेल्या पत्नीचे केस कापत आहे. यावेळी त्याची पत्नी ढसाढसा रडत आहे. तिचे सर्व केस कापल्यानंतर तो देखील त्याचे केस कापतो. पत्नीला हिंमत देण्यासाठी, आधार देण्यासाठी तो हे करतो. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर गुड न्यूज मूव्हमेंट नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

"कोणीही एकटे लढत नाही. प्रेमळ पाठिंबा दर्शविण्यासाठी, या पतीने कॅन्सरशी लढा देत असलेल्या पत्नीवर जीवापाड प्रेम आहे हे दाखवलं आहे. त्याने आपलं मुंडण केलं आहे. शेवटपर्यंत व्हिडीओ पाहा" असं व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. तसेच ट्रिमरच्या साहाय्याने नवरा आधी बायकोचे केस कापतो आणि नंतर स्वत:चही मुंडण करतो.

व्हिडिओच्या शेवटी या कपलच्या मुलाचा फोटो आहे. महिला कॅन्सरने त्रस्त असताना तिने बाळाला जन्म दिला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 1.6 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. ही संख्या झपाट्याने वाढत आहे. व्हिडिओवर लोक कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.

"मी अनेक वर्षांपासून कॅन्सर संस्थेत काम केलं आहे. एके दिवशी एक माणूस आपल्या बायकोसह आला आणि तिचे केस चमकदार निळे होते, सगळे तिच्याकडे बघत होते. त्याने आम्हाला सांगितले की त्याने आपले केस या रंगाचे केले जेणेकरून लोक त्याच्या बायकोऐवजी त्याच्याकडे पाहतील" असा अनुभव एका युजरने सांगितला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: husband supports wife who fighting cancer shaves his own head in solidarity emotional video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.