Husband wife funny Video: नवरा म्हणाला- "तुझ्यापेक्षा कियारा अडवाणीच चांगली.."; पण बायकोच्या एका उत्तराने पतिराजांची झाली 'बोलती बंद'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 03:56 PM2023-02-28T15:56:42+5:302023-02-28T15:57:36+5:30
बायकोसमोर एखाद्या अभिनेत्रीची स्तुती करणं म्हणजे भलतंच धाडस...
पती-पत्नींबद्दल अनेक विनोदी किस्से सर्रास सांगितले जातात. व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर असे बरेच जोक्स व्हायरल होतात. बहुतेक 'नवरा-बायको जोक्स'मध्ये नवरा हा बायकोच्या रागाचा बळी ठरलेला दिसतो. आता तर इंस्टाग्रामचे रीलही पती-पत्नीमधील तू-तू... मे-मैं आणि मजेशीर वादविवाद दाखवतात. नुकताच असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पाहिल्यानंतर अनेक पतींना वाटेल की त्यांच्यासोबतही असे कधी ना कधी घडलंच असेल.
एक माणूस आपल्या पत्नीची तुलना थेट अभिनेत्री कियारा अडवाणीशी करतो. यानंतर, पत्नी काय करते हे पाहून, तुम्हाला नक्कीच हसू येईल. पण त्यासोबतच तुम्हाला तुमची झालेली तशी अवस्थाही नक्कीच आठवेल. हा व्हिडीओ ५१ सेकंदांचा आहे, ज्यात नवरा म्हणतो- "अरे यार, ती अभिनेत्री आहे! तुला का राग येतोय? तू अशी चिडतेस की जसं काय मी तिच्याशी लग्न करणार आहे?" त्यावर बायको त्याच्याकडे न बघताच म्हणते- "जा कर तिच्याशी लग्न." मग नवरा म्हणतो- "ती जणू काही माझ्याशी लग्न करणारच आहे!" त्यानंतर बायको उपहासाने म्हणते- " का नाही करणार... नक्की करेल, तू खूप चांगला आहेस, सगळ्या मुली तुझ्या प्रेमात पडतात..." मग नवरा विचारतो- "मला कुठली अभिनेत्री आवडू शकत नाही?" यावर पत्नी भन्नाट उत्तर देते. ती काय म्हणजे ते जाणून घेण्यासाठी व्हिडीओ एकदा पाहा आणि सांगा तुमच्यासोबतही असं कधी झालंय का?
When husband compares his wife with @advani_kiara! 😂#KiaraAdvani#viral#cutecouplepic.twitter.com/JV99Tw6pPg
— Praveen 🇮🇳 (@PraveenSarraf_) February 1, 2023
दरम्यान, हा व्हिडिओ ट्विटर युजर परवीन (@PraveenSarraf_) यांनी पोस्ट केला होता. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले - जेव्हा पतीने पत्नीची तुलना कियारा अडवाणीशी केली!.. ही व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाली आहे. या व्हिडीओ लाइक्स आणि शेअर्सही बरेच मिळाले आहेत. तसेच अनेकांनी यावर भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत.