महिलेला एकाच वेळी १५ भटक्या कुत्र्यांनी घेरले अन् ; घटनेचा चित्तथरारक VIDEO व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 02:46 PM2024-06-25T14:46:04+5:302024-06-25T14:51:04+5:30

गेल्या काही महिन्यांमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

hyderabad manikonda women 15 stray dog attack during morning walk video goes viral on social media | महिलेला एकाच वेळी १५ भटक्या कुत्र्यांनी घेरले अन् ; घटनेचा चित्तथरारक VIDEO व्हायरल 

महिलेला एकाच वेळी १५ भटक्या कुत्र्यांनी घेरले अन् ; घटनेचा चित्तथरारक VIDEO व्हायरल 

Social Viral : गेल्या काही महिन्यांमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यातील काही घटनांमध्ये कुत्र्यांनी माणसाचा जीव घेतल्याचेही घडले आहे. अशातच,  कुत्र्याच्या हल्ल्याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे, हैदराबाद येथे मनीकोंडा येथील चित्रपुरी हिल्स येथे मॉर्निंग वॉकला निघालेल्या एका महिलेला १५हून अधिक कुत्र्यांनी चावा घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला सुमारे ४० सेकंद कुत्र्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत होती. ही घटना व्हिडीओ कॉलनीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा होत आहे.

व्हिडीओमध्ये ही महिला कुत्र्यांना पळवून लावताना दिसत आहे. या प्रयत्नात ती खाली पडताना दिसते. यानंतर ती स्वतःला सावरून उठते आणि जीव वाचवण्यासाठी तिथून पळण्याचा प्रयत्न करते, मात्र कुत्र्यांचा कळप तिच्या मागेमागे जाताना दिसतो. याचदरम्यान, एक दुचाकीस्वार तेथे आल्यानंतर महिला त्याच्याकडे जाते. काही वेळाने एक माणूस धावत येतो आणि कुत्र्यांना पळवून लावतो. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. तसेच भटक्या कुत्र्यांमुळे सर्वसामान्यांना होणारा नाहक त्रास केव्हा संपेल? असा सवालही या निमित्ताने यूजर्स विचारतायत.

या घटनेनंतर महिलेच्या पतीनेही सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून, माझी पत्नी नशीबवान आहे, जर तिच्या जागी लहान मुले किंवा वृद्ध असते तर कसे वाचले असते, असे त्याने म्हटले आहे. 

Web Title: hyderabad manikonda women 15 stray dog attack during morning walk video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.