'मी साधू-संत नाही, माझी बॅग चामड्यापासून बनवलेली...', जया किशोरींचे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 06:33 PM2024-10-29T18:33:37+5:302024-10-29T18:34:05+5:30

जया किशोरी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात त्या महागड्या ब्रँडची पर्स/बॅग वापरताना दिसत आहेत.

I am not a saint, my bag is not made of leather, Jaya Kishori spoke on That video | 'मी साधू-संत नाही, माझी बॅग चामड्यापासून बनवलेली...', जया किशोरींचे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

'मी साधू-संत नाही, माझी बॅग चामड्यापासून बनवलेली...', जया किशोरींचे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

Jaya Kishori News : प्रसिद्ध कथावाचक जया किशोरी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्या Dior ब्रँडची पर्स/बॅग वापरताना दिसतात. या बॅगची किंमत लाखोंमध्ये असल्याचा दावा केला जातोय. एवढंच नाही तर ही पिशवी प्राण्यांच्या चामड्याची असल्याचा दावाही केला जात आहे. यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी जया किशोरी यांना ट्रोल केले. पण, आता स्वतः जया यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

बॅगेत कुठेही चामड्याचा वापर नाही
एएनआयशी बोलताना जया किशोरी म्हणाल्या की, “सनातनी नेहमीच टार्गेटवर असतात. ज्या बॅगचा व्हिडिओ व्हायरल होतोय, ती कस्टमाईज्ड बॅग आहे आणि त्यात कुठेही चामड्याचा वापर नाही. मी कधीही चामड्याचा वापर केलेला नाही आणि करणारही नाही. मी अनेक वर्षांपासून ही बॅग वापरते. मी कधीच महागड्या वस्तू वापरू नका, असे सांगितले नाही. आयुष्यात भरपूर पैसे कमवा आणि तुम्हाला एखादी गोष्ट आवडली, तर तुम्ही ती खरेदी करा," असे जया म्हणाल्या.

मी कुठल्याही गोष्टींचा त्याग केला नाही
त्या पुढे म्हणतात, “मी काही साधू-संत नाही, त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा त्याग केलेला नाही. मग तुम्हाला त्याग करण्यास का सांगू? मी पहिल्या दिवसापासून स्पष्टपणे सांगते की, मी एक सामान्य मुलगी आहे, मी माझ्या कुटुंबासह सामान्य घरात राहते. मी तरुणांनाही सांगतो की, कठोर परिश्रम करा, पैसे कमवा, स्वतःला चांगले जीवन द्या आणि स्वप्ने पूर्ण करा," असे स्पष्टीकरण जया किशोरी यांनी दिले.

Web Title: I am not a saint, my bag is not made of leather, Jaya Kishori spoke on That video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.