'सुट्टी पाहिजे, वेब सीरिज पाहायची आहे', कर्मचाऱ्याचा आगळावेगळा अर्ज व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 05:50 PM2022-12-26T17:50:20+5:302022-12-26T17:50:50+5:30

Viral Leave Application: ट्विटरवर सुट्टीसाठी केलेला एक अर्ज चांगलाच व्हायरल होत आहे. यावर नेटीझन्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

'i need a holiday, wants to watch a web series', application of an employee goes viral... | 'सुट्टी पाहिजे, वेब सीरिज पाहायची आहे', कर्मचाऱ्याचा आगळावेगळा अर्ज व्हायरल...

'सुट्टी पाहिजे, वेब सीरिज पाहायची आहे', कर्मचाऱ्याचा आगळावेगळा अर्ज व्हायरल...

Next

Viral Leave Application: सोशल मीडियावर दररोज एकापेक्षा एक गोष्टी व्हायरल होत असतात. कधी लग्नपत्रिका विचित्र पद्धतीने छापली जाते, तर कधी बुंदेलखंडीमध्ये सुट्टीसाठी लिहिलेला अर्ज व्हायरल होतो. आताही सोशल मीडियावर सुट्टीसाठी घेतलेला एक अर्ज व्हायरल होत आहे. या अर्जामध्ये नेमकं काय खास आहे..?

वेब सीरिज पाहण्यासाठी अर्ज
सामान्यतः लोक आजारपणासाठी, एखादे अर्जंट काम आल्यावर किंवा बाहेर फिरायला जाण्यासाठी सुट्टी घेतात. पण, ट्विटरवर एका व्यक्तीचा सुट्टीसाठी केलेला अर्ज व्हायरल होतोय, ज्यात त्याने वेब सीरिज पाहण्यासाठी सुट्टी हवीये, असा अर्ज केला आहे. हा अर्ज पाहून नेटीझन्स चकीत झाले असून, यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

‘घरात बसून वेब सीरिज पाहायची आहे’
अभिशेक कुमार नावाचा कर्मचारी आपल्या बॉसला एक मेल पाठवतो, ज्यात तो “Pitchers” नावाची वेब सीरिज पाहण्यासाठी सुट्टी हवीये, अशी विनंती करतो. तो लिहितो की, ‘23 डिसेंबरला सुट्टी हवीये, यासाठीच हा अर्ज लिहितो आङे. मला घरात बसून Pitchers- Season 2 पाहायची आहे.' 

अशीही सुट्टी घ्यावी
ही व्हायरल पोस्ट अभिषेक नावाच्या पत्रकाराने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले की, सुट्ट्यांना नॉर्मलाइज करण्याची गरज आहे. फक्त आजारपण असल्यावर किंवा काम असल्यावरच सुट्टी घ्यावी असे काही नाही. सोशल मीडियावर या पोस्टला विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. 


या पोस्टला आतापर्यंत हजारो लोकांनी पसंती दिली असून, विविध प्रतिक्रियाही देत आहेत.

Web Title: 'i need a holiday, wants to watch a web series', application of an employee goes viral...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.