"मला आपल्या मदतीची गरज आहे..."; रतन टाटा कुणासाठी शोधताहेत ब्लड डोनर?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 03:50 PM2024-06-27T15:50:39+5:302024-06-27T15:51:10+5:30
...ही पोस्ट जबरदस्त व्हायरल होत असून आतापर्यंत 5 लाखहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. मोठ्या प्रमाणावर इंटरनेट यूजर्स ही पोस्ट शेअरदेखील करत आहेत.
देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा हे नेहमीच प्राण्यांची मदत करत असतात. आता ते एका कुत्र्याच्या उपचारासाठी मदत मागत आहेत. यासंदर्भात त्यांनी एक इन्स्टाग्राम पोस्ट देखील केली आहे. यात, "मुंबई मला तुमच्या मततीची गरज आहे", असे रतन टाटा यांनी म्हटले आहे. जखमी कुत्र्यावर त्यांच्या मुंबई येथील स्मॉल अॅनिमल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. त्याच्यासाठी एका ब्लड डोनरची गरज आहे. यासंदर्भातील माहितीही Instagram पोस्टमध्ये देण्यात आली आहे.
टाटांनी लिहिले आहे, "मी नक्कीच तुमच्या मदतीची प्रशन्सा करेल." अॅनिमल हॉस्पिटलमध्ये मेडिकल स्टाफला 7 महिन्यांच्या कुत्र्यासाठी रक्ताची आवश्यकता आहे. ही पोस्ट जबरदस्त व्हायरल होत असून आतापर्यंत 5 लाखहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. मोठ्या प्रमाणावर इंटरनेट यूजर्स ही पोस्ट शेअरदेखील करत आहेत.
का आहे रक्ताची गरज? -
इन्स्टा पोस्टनुसार, 'आमच्या रुग्णालयात या 7 महिन्यांच्या कुत्र्याल ब्लड ट्रान्सफ्यूजनची आवश्यकता आहे. त्याला संशयास्पद टिक फीवर आणि जीवघेण्या अॅनीमियाच्या कारणाने भरती करण्यात आले आहे. आम्हाला मुंबईत एका डोनरची अत्यंत आवश्यकता आहे.'
कोणत्या कुत्र्यांना करता येईल ब्लड डोनेशन? -
महत्वाचे ब्लड डोनेशन करणाऱ्या कुत्र्यांनाही काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. तो वैद्यकीयदृष्या स्वस्थ असावा. त्याचे वय 1 ते 8 वर्षांच्या आत असावे. त्याचे वजन किमान 25 किलो असावे. त्याचे संपूर्ण लसिकरण आणि डिवॉर्मिंग झालेली असावी. त्याला कुठलाही मोठा आजार नसावा. टिक्सची तक्रार नसावी. या अटी पूर्ण कराणाऱ्या कुत्र्याला ब्लड डोनेशन करता येईल.