वास घ्यायला गेली सुंदर फुलाचा पण त्यानंतर जे घडलं ते पडलं चांगलंच महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 07:16 PM2021-07-01T19:16:43+5:302021-07-01T19:18:37+5:30
एका तरुणीला फुलाचा वास घेणं चांगलच महागात पडलंय. आता तुम्हाला वाटेल फुलाचा वास घेण्यात काय आलंय मोठं? पण तुम्हाला वाचून धक्का बसेल की एका फुलाचा तिने वास घेतला व पुढे जे काही घडलं ते भयानक होतं.
आपण जेव्हा कोणत्या बागेत जातो तेव्हा फुलांचा वास घेतोच घेतो. काही फुल तर इतकी मनमोहक दिसतात की त्यांचा वास घेतल्यावाचून राहत नाही. मात्र एका तरुणीला फुलाचा वास घेणं चांगलच महागात पडलंय. आता तुम्हाला वाटेल फुलाचा वास घेण्यात काय आलंय मोठं? पण तुम्हाला वाचून धक्का बसेल की एका फुलाचा तिने वास घेतला व पुढे जे काही घडलं ते भयानक होतं.
तर झालं असं की, टिकटॉकर, साँग रायटर आणि सिंगर रफैला वेमन हिला आणि तिच्या मैत्रिणीला एक फुल दिसले. त्यांनी लगेच त्याचा वास घ्यायला सुरुवात केली. काहीवेळाने त्यांना नशा झाल्यासारखे वाटू लागले. रफैला म्हणते, ते फुल सुपर विषारी होतं ज्या फुलाचा आम्ही मुर्खासारखा चुकीने वास घेतला होता.
तिने कशीबशी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली. ती म्हणाली, ती आणि तिची मैत्रीण या फुलाचा वास घेण्यापासून स्वत:ला थांबवू शकले नाही. या फुलाचे नाव डेव्हिल ब्रेथ्स असून ते वास घेतल्यानंतर माणसाच्या डोक्यावर परिणाम करते. म्हणजेच, या फुलाचा वास घेतल्यानंतर भयानक आवाज एकू येतात व चित्रविचित्र दृश्य दिसतात. जगातील भयानक नशा उत्पन्न करणाऱ्या गोष्टींमध्ये हे फुल एक आहे.
तिने असं लिहिलंय की ती आणि तिच्या मैत्रीणीने रात्रभर या फुलाचा वास घेतला. त्यानंतर तिने या फुलाच्या भयानक परिणांमाबद्दल लिहिले. ती म्हणाली, आम्ही जेव्हा आमच्या मित्राच्या वाढदिवसाला पोहोचलो तर आमची तब्येत बिघडली. मी लगेच तिथुन निघाले. जेव्हा घरी पोचले तेव्हा मी पूर्णपणे झोपेत होते. मला अनेक भयानक स्वप्ने पडली. मी आयुष्यात पहिल्यांदा स्लीप पॅरलेसिस अनुभवला.
जेव्हा या गायिकेने गुगलवर या फुलाबाबत माहिती मिळवली तेव्हा तिच्या लक्षात आले की हे फुल प्रचंड विषारी आहे. याला डेव्हिल ब्रेथ असे म्हटले जाते. जर याचा वास जास्त घेतला तर याचे परिणाम फार भयानक ठरू शकतात. 'युएस डिपार्टमेंट ऑफ स्टेट' च्या अनुसार या फुलामुळे कोलंबियामध्ये जवळपास ५० हजार लोक रुग्णालयात भरती होतात.