शेतकरी बनून IAS अधिकाऱ्याची दुकानावर धाड; सोशल मीडियावर फोटो व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 03:57 PM2021-08-07T15:57:01+5:302021-08-07T15:58:28+5:30

ias g surya praveen chand visit fertilizer shop : जी सूर्य परवीन चंद यांना असे दिसून आले की, अनेक दुकानदार एमआरपीपेक्षा जास्त किंमतीत डायमोनियम फॉस्फेट (डीएपी) आणि युरिया विकत आहेत.

ias g surya praveen chand visit fertilizer shop as a farmer detected wrong doings by shop owners | शेतकरी बनून IAS अधिकाऱ्याची दुकानावर धाड; सोशल मीडियावर फोटो व्हायरल!

शेतकरी बनून IAS अधिकाऱ्याची दुकानावर धाड; सोशल मीडियावर फोटो व्हायरल!

Next

आंध्र प्रदेशातील विजयवाडाचे उपजिल्हाधिकारी जी सूर्य परवीन चंद यांची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. त्यांचे खत खरेदी करतानाचे फोटो व्हायरल होत आहे. खत खरेदी करण्यामागचा जी सूर्य परवीन चंद यांचा उद्देश आपल्या माहिती आहे का? तर  त्यांनी खतांच्या दुकानांवर शेतकऱ्यांसोबत होणाऱ्या फसवणुकीची तपासणी करण्यासाठी असे केले. कैकलुरू (Kaikaluru) आणि मुदिनेपल्ली (Mudinepalli ) मंडळाच्या खतांच्या दुकानांवर खत खरेदी करण्यासाठी ते चक्क शेतकरी वेशात आले होते. (ias g surya praveen chand visit fertilizer shop as a farmer detected wrong doings by shop owners)

दुकानदार एमआरपीपेक्षा जास्त किमतीत विकत होते
या दरम्यान  उपजिल्हाधिकारी जी सूर्य परवीन चंद यांना असे दिसून आले की, अनेक दुकानदार एमआरपीपेक्षा जास्त किंमतीत डायमोनियम फॉस्फेट (डीएपी) आणि युरिया विकत आहेत. तसेच, दुकानदार खत खरेदीचे कोणतेही बिल देत नव्हते. शिवाय या दुकानदारांनी आपली गोदामे खताने भरली आहेत. म्हणजेच त्यानी खतांचा साठा करून ठेवला होता.

@sushilrTOI ने  खत खरेदी करतानाचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, जी व्यक्ती खत घेताना दिसत आहे. ती आयएएस अधिकारी  जी सूर्य परवीन चंद आहे. शेतकऱ्यांसोबत या फसवणुकीबाबत परिसरातील एका दुकानदाराने त्यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांनी स्वतःच शुक्रवारी चौकशीसाठी हे पाऊल उचलले.

दुकानदारांवर कठोर कारवाई
उपजिल्हाधिकारी जी सूर्य परवीन चंद यांनी ज्या दोन दुकानदारांना हेराफेरीसाठी पकडले, त्यांच्यावर कठोर कारवाई केली. ती दोन दुकाने जप्त करण्यात आली आहेत. युरिया ज्याची किंमत 266.50 आहे, ते या दुकानदाराला 280 रुपयांना विकत होते. एवढेच नाही तर ते ग्राहकांचे आधार डिटेल्सही घेत नव्हते.

Read in English

Web Title: ias g surya praveen chand visit fertilizer shop as a farmer detected wrong doings by shop owners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.