IAS'ने शेअर केले 14 वर्ष जुने लेटर; या लेटरसाठी अनेकजण करतात प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 04:22 PM2023-02-02T16:22:58+5:302023-02-02T16:24:36+5:30
सोशल मीडियावर कधीही काहीही व्हायरल होत असते. नुकतेच एका आयपीएस अधिकाऱ्यांनी एक लेटर ट्विट केले आहे. आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अधिकाऱ्यांच्या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
सोशल मीडियावर कधीही काहीही व्हायरल होत असते. नुकतेच एका आयपीएस अधिकाऱ्यांनी एक लेटर ट्विट केले आहे. आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अधिकाऱ्यांच्या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. कधी त्यांचे ट्विट तरुणांना प्रेरणा देतात, तर कधी जीवनाशी संबंधित ज्ञान देतात.
अलीकडेच एका आयएएस अधिकाऱ्यांनी आपल्या आयुष्यातील आठवणी सांगितल्या ज्याचे लाखो इच्छुक स्वप्न पाहत आहेत. आयएएसने सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेच्या मुलाखतीचे कॉल लेटर ट्विटरवर पोस्ट केले, ते पाहून अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. 'माझी इच्छा आहे! ही संधी आमच्यासाठीही परिपूर्ण होऊ दे, असं एका नेटकऱ्यांनी म्हटले आहे. अवनीश शरण हे छत्तीसगड कॅडरचे 2009 बॅचचे IAS अधिकारी आहेत.
हा फोटो आयएएश अधिकारी अवनीश शरण यांनी 1 फेब्रुवारी रोजी पोस्ट केले होते, 'माझी नागरी सेवा परीक्षा मुलाखत कॉल लेटर, असं त्यांनी या पोस्टला कॅप्शन दिली आहे. त्यांच्या या ट्विटला आतापर्यंत 8 हजारांहून अधिक लाईक्स आणि 300 हून अधिक रिट्विट्स मिळाले आहेत. तसेच अनेक युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या.
नवरदेव खाली उतरताच घोडीचा मृत्यू; तिच्या बहिणीसह मालकाने गाठलं जिल्हाधिकारी कार्यालय
'आठवणी ताज्या झाल्या, सर… तर काहींनी म्हटलं की हे हजारो लोकांचं स्वप्न आहे. दुसरीकडे, काहींनी विचारले की तुम्हाला हे पत्र मिळाले असते तेव्हा कोणता क्षण होता. इतर वापरकर्त्यांनी असेच म्हटले की माझी इच्छा आहे, हे लेटर सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहे.